टोमॅटो | फळ पोखरणारी अळी | Helicoverpa armigera | IPM




*किडीचे नाव(शास्त्रीय नाव):-* फळे पोखरणारी अळी (हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा)  

*जीवनक्रम:-*

* किडीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष आणि प्रौढ या चार अवस्थांमधून पूर्ण होतो. 

 अंडी पिवळसर रंगाची असतात.  

* अळी सुरवातीला हिरव्या रंगाची असते. नंतर ती तपकिरी रंगाची होते. अंगावर राखाडी किंवा पांढऱ्या रंगाच्या रेषा असतात.

* कोष हा तपकिरी रंगाचा फळांच्या अवशेषात किंवा जमिनीत आढळतो.

* पतंग फिकट पिवळसर किंवा फिकट हिरव्या रंगाचा असतो.

* जीवनक्रम २५-३० दिवसात पूर्ण होतो.


 *एकात्मिक नियंत्रण:-*


 * पुनर्लागवडीवेळी मुख्य पिकाच्या कडेने मका आणि चवळी लावावी. तसेच झेंडूही लावावा.

* शेतात एकरी १० हेलिक लूर आणि फनेल ट्रॅप याप्रमाणात कामगंध सापळे लावावे.

* वेळोवेळी किडलेली फळे काढून खोल खड्ड्यात गाडून टाकावीत.

* लागवडीनंतर ४०-४५ दिवसांनी शेतात ट्रायकोग्रामा चिलोनिस हे मित्रकीटक १ ते १.५ लाख प्रतिएकर या प्रमाणात ७ दिवसांच्या अंतराने २-३ वेळा सोडावेत. हे कीटक फळे पोखरणाऱ्या किडीची अंडी शोधून त्यात स्वतःची अंडी घालतात. परिणामी फळे पोखरणारी कीड अंडी अवस्थेतच नष्ट होते.

* ५ टक्के निंबोळी अर्क किंवा कडूनिंब आधारित ॲझाडिरेक्टीन (३००० पीपीएम) २ मि.लि प्रतिलिटरप्रमाणे फवारणी करावी.

* फळे पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी त्यांना रोगकारक ठरणाऱ्या विषाणूचां वापर करता येतो. हेलीकोव्हर्पा न्यूक्लिअर पाॅलिहायड्रॉसीस व्हायरस (एचएएनपीव्ही) १ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे ऊन कमी झाल्यानंतर संध्याकाळी फवारणी करावी.

* बी. टी. जिवाणूजन्य किटकनाशक २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात करावी.

* रासायनिक कीड नियंत्रण किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीजवळ असल्यास, क्विनॉलफाॅस (२५ ईसी) १ मिली किंवा इंडोक्झाकार्ब (१४.५ एससी) ०.८ मिली आणि अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यास नोव्हॅल्युरॉन (१० ईसी) ०.७५ मिली किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिली.प्रतिलिटर पाणी घेऊन फवारणी करावी. 

संदर्भ-अग्रोवोन


एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

ऊसामधील लोकरी मावा कीड । प्रभावी नियंत्रण । wooly Aphids Management

रसशोषक किडी । पिकाचे कसे नुकसान करतात । Damage by Sucking Pest