उसावरील लोकरी मावा खाणारी कोनोबाथ्रा अळी |Conobathra |Biocontrol Agent

                      *ओळख मित्रकिडींची* 


                         *कोनोबाथ्रा अळी*







शेतकरी मित्रहो गेल्या काही दिवसापासून आपण प्रत्येक मित्रकिडीची सविस्तर माहिती घेत आहोत.तर आज आपण कोनोबाथ्रा अळी विषयी माहिती घेऊयात. 


 *🌱शास्त्रीय नाव:-* 

Conobathra aphidivora/Dipha aphidivora


  नावातच या किडीचे भक्ष्य सांगितलेले आहे,ही अळी एफिड म्हणजेच मावा शत्रूकिडीस भक्ष्य बनवते.


 *🌱जीवनचक्र:-* 

प्रौढ पतंग सुटे किंवा समूहात अंडी देतो. त्यानंतर अंड्यातून अळी बाहेर पडते.अळी चार वेळा कात टाकते.थोडी मोठी झालेली अळी भक्ष्याच्या शोधात बाहेर पडते व मावाकिडीचा फडशा पाडते. विशेषतः उसावरील लोकरी मावा. ही अळी अवस्था फक्त परभक्षी म्हणून काम करते.10 ते 15 दिवसात पूर्ण वाढ झालेली अळी लोकरी मावा असलेल्या पानावर पांढऱ्या पुंजक्यामध्ये कोष अवस्थेत जाते. त्यानंतर कोशामधून चॉकलेटी राखाडी रंगाचा पतंग बाहेर पडतो. अशा प्रकारे पूर्ण जीवनचक्र 26 ते 37 पूर्ण होते.

पतंग 

 

*🌱फायदे:-* 

ऊसावरील लोकरी मावा तेच पिट्या ठेकणांचा कोनोबाथ्रा अळी फडशा पाडते.एका दिवसात 150 पेक्ष्या अधिक शत्रूकिडींचा फडशा पाडते.


 *🌱ओळखावे कसे?* 

●किडीचा पतंग चॉकलेटी राखाडी रंगाचा साधारण 8 ते 10 मीमी इतका असतो.

●अळी हिरवट पांढरी दिसते,आणि कोष हा जाळीदार पांढऱ्या पुंजक्यात असतो,उसाच्या पानांवर असा जाळीदार कोष दिसल्यास तो कोनोबाथ्राचा आहे असे समजावे.

कोष 


*🌱संवर्धन:-* 

●प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात एका गुंठ्यांत 50 कोष सोडावेत.त्यातून बाहेर पडणारे पतंग अंडी देतात व अळी बाहेर पडून आले काम चालू करते.

●शेडनेट मध्ये या किडीची पैदास होऊ शकते.

●अतिविषारी कीटकनाशक फवारू नये.

●जाळीदार पांढरा कोष निदर्शनास आल्यास नष्ट करू नये.

https://www.facebook.com/groups/522198518657687/

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean