उन्हाळी भुईमूग | पेरणी | सुधारित वाण |
राज्याच्या वेगवेगळ्या भागात उन्हाळी भुईमूग लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण खरीप हंगामापेक्षा चांगले आणि खात्रीशीर उत्पन्न उन्हाळी हंगामामध्ये मिळू शकते.त्यामुळे बरेच शेतकरी या हंगामामध्ये भुईमुगाची लागवड करतात.
उन्हाळी भुईमूग लागवड साधारण १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणे गरजेचे आहे. कारण उशिरा पेरणी झाली कि पुढे काढणीच्या वेळी पीक पावसात सापडण्याची भीती असते. त्यामुळे वेळेत पेरणी झाल्यास चांगले उत्पन्ना सोबत वेळेत पीक काढणी होते.
उन्हाळी भुईमुगासाठी जमीन,पाण्याची व्यवस्था, हवामान या सर्व गोष्टींची काळजी घेऊन शिफारसीत वाण वापरणे गरजेचे आहे.
उन्हाळी भुईमुगाच्या काही वाणांची वैशिष्ट्ये:-
टीएजी - 24:-
हे उन्हाळी भुईमूग पिकाचे वाण वाढीच्या प्रकारानुसार उपट्या भुईमूग या प्रकारात मोडते. याचा परिपक्वता कालावधी उन्हाळी हंगामात साधारणता 110 ते 115 दिवस आहे. या वाणाची सरासरी हेक्टरी उत्पादकता 24 ते 26 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. हा वाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आला आहे.
टीजी - 26:-
उन्हाळी भुईमुगाचा हा वाण वाढीच्या प्रकारा नुसार उपट्या भुईमूग या प्रकारात मोडतो. याचा परिपक्वता कालावधी साधारणतः 110 ते 115 दिवस आहे. याची सरासरी उत्पादकता 25 ते 32 क्विंटल प्रति हेक्टर एवढी दिली आहे. हा उन्हाळी भुईमूग पिकाचा वाण संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात लागवडीसाठी शिफारस करण्यात आला आहे.
फुले उन्नती (आर.एच.आर.जी 60 83):-
हा उन्हाळी भुईमुगाचा वान वाढीच्या प्रकारानुसार उपट्या भुईमूग या प्रकारात मोडतो. या वानाचा परिपक्वता कालावधी साधारणता 120 ते 125 दिवस एवढा असून सरासरी उत्पादकता हेक्टरी 30 ते 35 क्विंटल एवढी दिली आहे.हा वाण स्पोडोप्टेरा अळी, तांबेरा, पानांवरील ठिपके, खोडकुज रोगास मध्यम प्रतिकारक आहे. हा वाण संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आला आहे.
फुले भारती (जे. एल.776):-
हा उन्हाळी भुईमुगाच्या शिफारशीत वाण वाढीच्या प्रकारानुसार उपट्या भुईमूग या प्रकारात मोडतो. या वानाचा परिपक्वता कालावधी 115 ते 120 दिवस तर हेक्टरी उत्पादकता 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर एवढी दिली आहे. हा वाण उत्तर महाराष्ट्रासाठी शिफारशीत केला आहे.
एस. बी. 11:-
हा उन्हाळी भुईमूग पिकाचा वान फार जुना म्हणजे 1965 यावर्षी शिफारशीत केले आहे. हा वाण वाढीच्या प्रकारानुसार उपट्या भुईमूग या प्रकारात मोडतो. हा वाण साधारणतः 115 ते 120 दिवसांत परिपक्व होतो व या वाणाची सरासरी हेक्टरी उत्पादकता फार कमी म्हणजे 15 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर एवढी दिली आहे.
संदर्भ-इंटरनेट
एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा