मित्रकीटक | Bio-control Agent | Helpful insect |



शेती करत असताना शेतकऱ्याला पिकामध्ये बऱ्याच प्रकारच्या किडी दिसतात.काही किटक हे पिकाचे नुकसान करणारे असतात तर काही कीटक हे पिकाचे नुकसान करणाऱ्या किडींवर जगणारे असतात. पण शेतकरी पिकामध्ये कोणतेही जरी कीटक दिसले तरी शेतकऱ्याला ती कीड पिकाचे नुकसान करणारी आहे असे वाटून बरेच शेतकरी लगेचच रासायनिक औषध आणून फवारणी करतात आणि अनावश्यक खर्च वाढवला जातो. 

   सध्या शेतकऱ्याला दुसऱ्यांच्या सल्ल्यानुसार नाही तर स्वतः त्यामधील अभ्यास करणे गरजेचे आहे म्हणजेच काय तर सध्या शेतात कोणते पीक आहे, त्या पिकामध्ये येणारी कीड कोणती? ती पिकासाठी किती हानिकारक आहे? नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या? या गोष्टी माहित असणे गरजेचे आहे.

  पिकामध्ये दिसणाऱ्या सर्व किडी या पिकाचे नुकसान करणाऱ्या नसतात. बऱ्याच वेळेला काही किडी या दुसऱ्या किडीला खाताना पाहायला मिळतात, म्हणजेच काय तर नुकसानकारक कीड जशी आपल्याला पिकामध्ये पाहायला मिळते त्याच प्रमाणे नैसर्गिक रित्या कीड नियंत्रणाचे काम होताना आपल्याला पाहायला मिळते. 

   मित्रकिडी या शत्रुकीडीच्या वेगवेगळ्या अवस्थांवर जगत असतात.काही मित्रकिडी या शत्रुकीडीची अंडी अवस्था नष्ट करण्याचे काम करतात. जसे ट्रायकोग्रामा हा मित्रकीटक अळीवर्गीय शत्रुकीडीची अंडी नष्ट करून त्या माध्यमातून ते आपली पिढी पुढे वाढवतात. 

  काही मित्रकिडी या अळी अवस्था नष्ट करण्याचे काम करतात. त्यामध्ये असेसिअन बग म्हणजेच ढेकणासारखे असतात आणि अळी अवस्था नष्ट करून ते त्यांच्यापासून आपली उपजीविका भागवतात. 

  काही मित्रकीटक हे किडीचे प्रौढ पतंग पकडून खाताना पाहायला मिळतात. त्यामध्ये प्रार्थना कीटक असतील किंवा ड्रॅगन फ्लाय सारखे मित्रकीट हे शत्रुकीडीला खाताना आपल्याला पाहायला मिळतात. 

त्याचप्रमाणे बरेच मित्रकिडी आहेत ज्या वेगवेगळ्या राशशोषक किडीला खाताना आपल्याला पाहायला मिळतात.मग त्यामध्ये लेडी बर्ड बीटल म्हणजेच ढालकिडा असेल त्याची अळीसुद्धा आपल्याला मावा खाताना पाहायला मिळते,तसेच ग्रीन लेसिविंग हा सुद्धा वेगवेगळ्या मावा,तुडतुडे यांचा फडशा पडताना आपल्याला पाहायला मिळते. 

त्यानंतर ऑस्ट्रेलियन ढालकिडीची प्रौढ अवस्था तसेच अळी अवस्था आपल्याला पिठ्या ढेकूण खाताना वेगवेगळ्या झाडावर पाहायला मिळतात. 


  यासारख्या वेगवेगळ्या मित्रकिडी या शत्रूकीडींना नष्ट करून नैसर्गिक रित्या कीड व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे पिकाचे चांगल्या प्रकारे कीड नियंत्रण केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकामध्ये आढळणाऱ्या किडी ओळखूनच नुकसान करणाऱ्या किडींसाठी योग्य नियंत्रणात्मक उपाय अवलंबायला हवेत. 


*एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..*👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean