झायगोग्रामा भुंगा | Zygogramma Beetle| Biocontrol Agent | मित्र किड

IPM SCHOOL:seedling:

ओळख मित्र कीटकांची भाग:-3





:beetle:झायगोग्रामा भुंगा:beetle:

जगभरात झायगोग्रामा मित्र किडीच्या प्रजातीच्या 100 हुन अधिक प्रजाती आढळतात.ह्या किडींची *झायगोग्रामा बायकोलोराटा* ही प्रजात मित्र कीटक म्हणून आपण वापरू शकतो.
●सर्व मित्रकीटक परभक्षी किंवा परजीवी असतात असे नाही काही मित्रकीटक शेतातील नको असलेल्या तनांवर उपजीविका करून नैसर्गिकरित्या तन नियंत्रण करतात.
त्यापैकी एक म्हणजे
झायगोग्रामा बायकोलोराटा भुंगा जो गाजर गवत आणि काँग्रेस तणांचा फडशा पाडतो.

हा कीटक अंडी अळी कोष आणि भुंगा या चार अवस्थांतून आपले जीवनचक्र पूर्ण करतो.
त्यापैकी अळी आणि भुंगा ह्या अवस्था शेतातील गाजर गवताचा फडशा पडतात.
अळी अवस्थेतील झायगोग्रामा गाजर गवताची कोवळी पाने आघाशीपणे खातो.
प्रौढ भुंगा गाजर गवताच्या कळ्या,पाने तसेच देठ व खोड तसेच काँग्रेस तण खातो.

*कसे ओळखावे?*
भुंगा लेडी बर्ड बिटल च्या आकारात असतो. दुधी पांढऱ्या रंगाची पाठ त्यावर तीन काळ्या रेषा आणि बाजूस काळ्या रंगाचे डिझाइन असते. एक ते दीड महिन्यात आपलं जीवनचक्र पूर्ण करतो.

त्यामुळे शेतात नको असलेले गाजर गवत आणि काँग्रेस तण नैसर्गिक पद्धतीने नियंत्रित करू शकतो.
IPM School

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean