ढोबळी मिरची | Capsicum | किडी | Pest Management |
ढोबळी मिरचीला बाजारपेठेमध्ये संपूर्ण वर्षभर मागणी असते. त्यामुळे अनेक शेतकरी ढोबळी मिरचीची लागवड करतात.पण पिकामध्ये येणाऱ्या किडींचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. ढोबळी मिरची पिकावर बहुतेक करून रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होतो. कोणत्याही किडीच्या नियंत्रणासाठी, सुरुवातीपासून प्रतिबंधात्मक उपायांचा एकात्मिक पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे.
मावा:-
हे कीटक आकाराने खूपच लहान असतात आणि पानाच्या कोवळ्या भागामधून रस शोषून घेतात. त्यामुळे झाडे निस्तेज होतात आणि झाडांची वाढ थांबते. त्याचबरोबर मावा वनस्पतींवर राहून विषाणूजन्य रोग पसरवण्याचे काम करतात.
फुलकिडे:-
हे कीटक आकाराने खूपच लहान असून पानांचा रस शोषून घेतात. फुलकिड्यांचा प्रादुर्भाव देठ आणि फळांवरही आढळतो. फळांवर पांढर्या रेषांमुळे फळांचा दर्जा घसरतो आणि फळे बाजारात येत नाहीत. प्रादुर्भाव ग्रस्त झालेली पाने आतील बाजूने आखडलेली दिसतात.
कोळी:-
हि कीड पांढऱ्या रंगाची असून आकाराने खूपच लहान असते. त्याच्या प्रादुर्भावामुळे पाने खालच्या दिशेने गोलाकार होतात. त्यामुळे पानांचा आकार व फळांचा आकार लहान राहतो. या किडीच्या प्रादुर्भावामुळे फुले व फळे गळतात. हवामान उष्ण व दमट असल्यास पानांवर व फळांवर या किडींचा प्रादुर्भाव अधिक असतो.
फळे खाणारे कीड:-
हा कीड तपकिरी रंगाची दिसते. अळी फळ पोखरते आणि फळाचे नष्ट/नुकसान करते. या किडीमुळे फळांचे नुकसान होऊन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
नियंत्रण:-
* किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा.
* शेत तणमुक्त ठेवा.
* रोपे लावल्यानंतर पिवळे-चिकट सापळे ३० ते ४० प्रति एकर लावावेत.
* या चिकट सापळ्यांमुळे पिकामध्ये येणाऱ्या रसशोषक किडींना नियंत्रित करणे सोपे होते.
* सुरुवातीपासूनच निम ऑईलची फवारणी करा.
* शेतात नैसर्गिकरित्या कीटकांचे नियंत्रण करणाऱ्या मित्रकीटकांची संख्या वाढवा.
* रासायनिक कीटकनाशकाचा वापर तेव्हाच करावा जेव्हा किडीची संख्या नुकसान पातळीच्या वर जाते.
* फळ पोखरणाऱ्या किडीच्या पतंगांना पकडण्यासाठी एकरी १० ते १२ कामगंध सापळे लावावेत.
* मावा किडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी 10-12 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून करावी. मॅथोमिल 1 मि. किंवा एसीफेट - 1 ग्रॅम किंवा डेसीस 0.5 मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* पिकावरील फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी ऍसिफेट 1 ग्रॅम किंवा मेथोमाईल 3 मि.ली. किंवा लॅनेट 3 मि.ली. हे प्रमाण मिक्स करावे आणि 10-12 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून औषध फवारावे.
* कोळी किडीच्या नियंत्रणासाठी पुढील कीटकनाशकांची 10-12 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी. डिकोफोल (कॅलाथेन) 2.2 मि.ली. किंवा Maverick 0.5 मि.ली. किंवा डेमेटॉन मिथाइल 1 मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* फळ पोखरणाऱ्या अळीसाठी HANPV ची किंवा स्पिनोसॅड 6 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करता येते.
संदर्भ-ऍग्रोवन
एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा