टोमॅटो | Pest Management | कामगंध सापळे | IPM
संपूर्ण राज्यामध्ये घेतले जाणारे आणि बाजारपेठेमध्ये संपूर्ण वर्षभर मागणी असणारे पीक म्हणजे टोमॅटो. टोमॅटो पिकाची लागवड सर्व हंगामामध्ये केली जाते. टोमॅटो पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कीड पिकाचे नुकसान करते. जे शेतकरी चालल्या प्रकारे आणि सुरुवातीपासून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करतात तेच किडींना पिकाचे नुकसान करण्यापासून थांबवू शकतात.
बरेच शेतकरी किडीच्या नियंत्रणासाठी फक्त रासायनिक पद्धतीवर अवलंबून असतात. त्यांचा कीड नियंत्रणासाठी खर्च वाढत राहतो आणि किडीचे नियंत्रण होत नाही.उलट सारखे रासायनिक औषध फवारणीमुळे बऱ्याच वेळा त्या किडीमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते आणि रासायनिक औषधाला न जुमानता कीड पिकाचे नुकसान करत राहते.म्हणून तर एकात्मिक पद्धतींचा वापर करून कीड नियंत्रण केले पाहिजे. कामगंध सापळे यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात.
टोमॅटो पिकामध्ये कोणत्या किडींच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे वापरता येतील?
नागअळी:-
टोमॅटो पिकामध्ये नागअळीचा प्रादुर्भाव रोप नर्सरींमधून आणले जाते त्यावेळेपासून आपल्याला दिसून येतो. रोपांची लागण केल्यानंतर उष्ण हवामानात किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.या किडीच्या नियंत्रणासाठी टू-टॉम ल्युर आणि वॉटर ट्रॅप वापरल्यास किडीचे नर पतंग त्या सापळ्यात अडकून मरून जातात.
फळे पोखरणारी अळी:-
त्यानंतर पुढची कीड येते कि म्हणजे फळ पोखरणारी अळी.फळे लागायला चालू झाल्यानंतर या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.या किडीच्या प्रादुर्भावामुळे खूप मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान होते.या किडीच्या पतंगांना पकडण्यासाठी हेलिक ल्युर आणि फनेल ट्रॅप वापरता येतील.
फळमाशी:-
टोमॅटोमध्ये फळाचा रंग हिरव्यामधून लाल होत असताना वेलवर्गीय फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. फळमाशी फळाला डंख मारते त्यामुळे फळ मऊ पडते आणि फळ खराब होते. फळाची वाढ पूर्ण झालेली अवस्थेमध्ये फळमाशीच्या सापळे लावणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही मेलन फ्लाय ल्युर आणि आईपीएम ट्रॅप वापरून फळमाशीच्या नियंत्रण चालल्या प्रकारे करू शकता.
काही वेळेस स्पोडो अळी म्हणजेच पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसतो या अळीच्या पतंगांना पकडण्यासाठी स्पोडो ल्युर आणि फनेल ट्रॅप वापरता येईल.
या सर्व किडींच्या नियंत्रणासाठी तुम्ही वेळोवेळी कामगंध सापळ्यांचा वापर करणे गरजेचे आहे. जर सुरुवातीपासूनच सापळ्यांचा वापर केला तर नक्कीच कीड नियंत्रणामध्ये खूप चांगली मदत होईल.कीड नियंत्रणासाठी सर्व पद्धतींचा वापर करून कमी खर्चात किडीला आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवता येईल आणि उत्पन्न चांगले घेता येईल.
एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा