Precautions before Purchasing Pesticides| किडनाशके खरेदी करतांना लक्षात घ्यावयाच्या बाबी

IPM SCHOOL

*किडनाशके खरेदी करतांना लक्षात घ्यावयाच्या बाबी*

1. पिकांवर रस शोषणाऱ्या किडींसाठी १५ ते २० % झाडांवर व खोड किडे, बोड अळ्या पाने पोखरणाऱ्या/गुंडाळणाऱ्या/ खाणाऱ्या अळ्यांचा उपद्रव ५ % पेक्षा जास्त असल्यास रासायनिक किडनाशकाचा वापर करावा. यापेक्षा कमी उपद्रव असल्यास जैविक किडनाशके वापरावीत.
2. फक्त तज्ञांद्वारे, कृषिदर्शनी, पीक संरक्षण पुस्तिका व इतर विश्वासपात्र दैनिके, नियतकालिके याद्वारा शिफारस केलेली किडनाशके घ्यावीत.
३. रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही व वनस्पतीचे विविध भाग खाणाऱ्या किडींसाठी स्पर्श व पोट विषेशिफारस केलेल्या मात्रेनुसार वापरावीत.
४. किडनाशकांच्या बाटल्या तथा पाकिटे खरेदी करतांना त्यावरील वापराची अंतिम तारीख बघून घ्यावी.
५. आपणांस हवे असलेले किडनाशकाचे तांत्रिक नांव व त्याचे प्रमाण घटकात दिलेले आहे, याची खात्री करून घ्यावी. उदा. इमिडाक्लोप्रीड हे तांत्रिक नांव कॉफिडॉर १७.८ % एस. एल., टाटामिडा १७.८ % एस. एल. इ. व्यापारी नावाने मिळत असले तरी प्रत्येक पॅकिंगवर घटकाखाली इमिडाक्लोप्रीड व त्याचे प्रमाण दर्शविलेले असते.

६. कोणत्याही तज्ञांकडे जाण्याअगोदर किडीचा नमुना वापरलेल्या किडनाशकांची व्यापारी व तांत्रिक नावे किडीच्या उपद्रवाचे प्रमाण अशी माहिती दिल्यास किड समस्यांवर योग्य शिफारस मिळते.

*:point_down:अशाच एकात्मिक कीड व्यवस्थापन व सेंद्रिय शेती विषयी नवनवीन अपडेट्ससाठी सामील व्हा.:point_down:*

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean