कीटकनाशके। Insecticide Marathi Information| Systemic Insectiside| Contact Insecticide|


 तर आपण कोणतीही की किटनाशक फवारणी करत असताना,जे कीटकनाशक फवारतोय याची संपूर्ण माहिती असली पाहिजे.जसे की वापरण्याचे प्रमाण, कोणत्या किडी साठी घेतोय व ते कोणत्या प्रकारे काम करते.


कीटकनाशक फवारणी केल्यानंतर ते किड कोणत्या प्रकारे मारते यावर कीटकनाशकांचे अनेक प्रकार पडतात,त्यातील
मुख्य म्हणजे स्पर्षजन्य(Contact insecticide) आणि आंतरप्रवाही(Systemic insecticide) हे दोन प्रकार आपल्या वापरात आले असतील.आज त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत.

कीटकनाशकाच्या बाटलीवर किंवा पॅकेटवर त्याच्या नावाच्या बाजूला ते स्पर्षजन्य(contact) आहे की आंतरप्रवाही(Systemic) याचा स्पष्ट उल्लेख असतो.

स्पर्षजन्य कीटकनाशक(Contact insecticide):-
आपण घेतलेले किटकनाशक स्पर्षजन्य असेल,तर फवारणीनंतर पिकाच्या पानांवर पसरते आणि जेव्हा अळीचा संपर्क त्या किटकनाशकाशी येतो किंवा फवारणी केलेले पान खाते तेव्हा ती मरून जाते.

आंतरप्रवाही किटकनाशक(Systemic insecticide):-
आंतरप्रवाही किटकनाशक (Systemic insecticide) असा उल्लेख असलेले कीटकनाशक आपण जर फवारले असेल ते पानावर पडताच,पानांत शोषले जाते.त्यानंतर ते झाडाच्या प्रत्येक भागात पोहचवले जाते.जर फवारणी पानांवर झाली तर ते मूळापासून शेंड्यापर्यंत पोहोचते.मग अशा किटनाशकांची फवारणी केल्यानंतर जेव्हा अळी पिकाचा कोणताही भाग खाईल तेव्हा कीटकनाशक पोटात जाऊन ती मरून जाईल.

*कोणतेही पीक असुद्या किटव्यवस्थापन हे एकात्मिक पद्धतीने झाले पाहीजे कारण कीटकनाशकांचा अप्रमानित वापर,कीटकांमध्ये तयार होणारी किटनाशक प्रतिरोधक क्षमता व कीटकनाशकांचे खाद्यपदार्थामध्ये मिळणारे अंश या गँभीर बाबी समोर येत आहेत.एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने आपण किटकनाशकांचा वापर कमी करू शकतो,त्यावर होणारा खर्च कमी करू शकतो.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean