Trap crop | Maize | सापळा पीक | एकात्मिक कीड नियंत्रण
सर्वच शेतकरी हंगामानुसार वेगवेगळी पिके घेतात आणि सर्वच पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव होतो.बदलता निसर्ग आणि पिकावर होणार किडींचा प्रादुर्भाव आणि त्यासाठी होणारा खर्च यामुळे शेतकरी हैराण होत आहे.बऱ्याच वेळेला शेतकरी पिकामध्ये कीड दिसू लागल्यावर कीड नियंत्रणासाठी धडपड करतो पण जर एकात्मिक कीड नियंत्रण पद्धती समजून घेतली तर कीड नियंत्रण तर सोपे होईलच पण त्यासोबतच होणारा खर्चही आटोक्यात येईल.
किडीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीपासून मुख्य पिकाचे संरक्षण करण्यासाठी मशागत ,सापळा पीक,आंतरपिके,कामगंध सापळे,जैविक कीटकनाशके यासारख्या गोष्टींचा महत्वाचा भाग आहे. त्यामधील मक्याचे पीक कोणत्या किडीसाठी सापळा पीक म्हणून कार्य करते ते बघूया.
* मक्का हे ज्वारीइतके महत्वाचे चारा पीक आहे. तसेच खरीप आणि रब्बी हंगामात मुख्य व आंतरपीक म्हणून संपुर्ण महाराष्ट्रभर घेतले जाते. या सोबतच मक्का हे उत्तम सापळा पीक म्हणून सुद्धा ओळखले जाते.
* मक्का हा कुंपण(बॉर्डर क्रॉप),आंतरपीक पद्धतीने शत्रू किडींचे नियंत्रण करू शकतो.
* मक्क्याकडे फुलकिडे (थ्रीप्स) चांगल्या प्रकारे आकर्षित होतात. त्यामुळे ज्या पिकामध्ये थ्रीप्स व इतर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव असतो त्या पिकामध्ये मक्का हे आंतरपीक घेतल्यास फुलकिडे मुख्य पिकावर न जाता मक्क्याकडे आकर्षित होतात.
* तसेच मक्का हा उंच वाढतो.सोयाबीन,हरभरा या पिकांची पेरणी करताना बियाण्यामध्ये थोडे मक्याचे बियाणे मिसळल्यास शेतामध्ये जागोजागी मक्क्याच्या धाटांचे नैसर्गिक पक्षिथांबे तयार होतात. यामुळे मुख्य पिकातील अळ्या,पक्षी वेचून खातात व किडींची संख्या मर्यादित राहते.
* मक्का आपण मुख्य पीकाभोवती लावल्यास विविध किडींच्या पतंगांना मुख्य पिकात शिरण्यास अटकाव होतो. पतंग पिकाबाहेरच थोपवले जातात.
* या भौतिक उपयोगांबरोबर मक्का हा ग्रीन लेसविंग(क्रायसोपर्ला) या मित्रकीटकास पिकामध्ये आमंत्रित करतो. या लेसविंगची अळी पिकामध्ये येणाऱ्या माव्याच्या फडशा पाडते.
या गोष्टी विचारात घेऊन मक्का पिकाचा आपण प्रभावी सापळा पीक म्हणून उपयोग करून घेऊ शकतो.
*एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..*👇👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा