पायरेट ढेकूण । Pirate Bug | Mitrakitak | Biocontrol Agent | मित्रकीटक | Mitrakit

ओळख मित्रकीटकांची:- भाग 2

*पायरेट ढेकूण/Orius spp (Minute Pirate Bug)*


मागील भागात आपण लेडी बर्ड बिटल  या मित्र किडीविषयी महिती घेतली,आज आपण पायरेट ढेकूण या मित्रकिडीविषयी माहिती घेऊ.


 *तर हे पायरेट ढेकूण नैसर्गिकरित्या मिश्राहारी असतात.* 

 
*जीवनचक्र:-* 

●हा कीटक आपले जीवनचक्र ढेकूण-अंडी-पिल्ले आणि पुन्हा ढेकूण या अवस्थेतून पूर्ण करतो.

●4 ते 5 दिवसानंतर अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात.पिल्ले भगव्या रंगाची असतात.पुढे 7 ते 10 दिवसात प्रौढ ढेकूण बनतात.

●मादी ढेकूण जीवनकाळात 80 ते 100 अंडी देतात.

●त्यामधील मोठी पिल्ले व प्रौढ भुंगे हे जास्त करून छोटे कीटक,त्यांची अळी अवस्था,अंडी,तसेच कोळी,फुलकिडे,छोटे कीटक,मावा व पांढरी माशी यांच्यावर आपली उपजीविका करतात.

●तीन ते चार आठवड्यात जीवनचक्र पूर्ण करतात.

●जर हे कीटक खाण्यास उपलब्ध नसतील तर परागकण व पेशीरस सुद्धा खायला चालू करतात.


कसे ओळखावे:-

●प्रौढ ढेकूण काळपट व पंख  पांढरत रंगाचे असतात.

●सोंडेकडील भाग पूर्ण काळा असतो,मागील बाजू सफेद होत येते.

●प्रौढ कीटकांची साधारण जाडी 2-3 मीमी तर लांबी 7-8 मीमी  इतकी असते.

●काही शत्रूकिडी या पायरेट ढेकणासारख्या दिसतात.पायरेट ढेकणाची सोंड त्याच्या मिशांपेक्षा जाड असते व शत्रूकिडींच्या सोंडी त्यांच्या मिशांपेक्ष्या लहान असतात.




 *मित्रकिट संवर्धन* 

●पिकामध्ये झेंडू व बडीशेप ही आंतरपिके लावावीत.

●अतिविषारी कीटकनाशके वापरू नयेत.


 *अशाच नवनवीन अपडेट्स साठी खालील लिंक क्लीक करून जॉईन व्हा* 

https://www.facebook.com/groups/522198518657687/Facebook


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean