लेडी बर्ड बिटल | Mitrakitak | Biocontrol Agent | मित्रकीटक

*ओळख मित्रकीटकांची भाग-1*



 नमस्कार शेतकरी  मित्रांनो...

 कीटक म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर एक विचित्र आकाराचा प्राणी किंवा अळी असं चित्र तयार होते.

 एखादा कीटक पिकात दिसला तर लगेच आपण मारून टाकतो किंवा फवारणी करतो.

              पण सर्वच कीटक पिकासाठी हानिकारक असतात असं नाही.काही कीटक पिकावर येणाऱ्या किडीवर आपली उपजीविका करतात,आणि नैसर्गिकरित्या कीटकांचे संतुलन राहते.अशा किडींना आपण मित्रकीटक तसेच बायोकंट्रोल एजंट म्हणून ओळखतो.

 याच सर्व मित्र कीटकांची ओळख व जीवनचक्र आजपासून आपण जाणून घेणार आहोत.

              

 *लेडी बर्ड बिटल(Harmonia axyridis)* 


●शेतकरी या किटकास चित्रांग भुंगा किंवा टपरी असेही म्हणतात. 

●हा कीटक आपला जीवनक्रम अंडी-अळी-कोष-भुंगा अशा चार अवस्थेतुन पूर्ण करतो. यामधील अळी व भुंगा या दोन अवस्था पिकावर येणाऱ्या माव्याचा फडशा पडतात.

●या किडीचे प्रौढ भुंगे मावा,पिट्या ढेकूण,कोळी,पतंगवर्गीय किटकांची अंडी,लहान अळ्या यावंर आपली उपजीविका करतात.

●लेडी बर्ड बिटलची अळी एका दिवशी 20 ते 25  तर प्रौढ भुंगा 60 ते 70 मावा किडींचा फडशा पाडते.


 *ओळखावे कसे?:-* 

           लेडी बर्ड बिटल आणि काही शत्रू कीटक ढाल किडे दिसायला थोडे सारखे असतात पण थोडे निरीक्षण केल्यास त्यांच्यामधील फरक स्पष्ट दिसतो.

           भुंगा(Harmonia axyridis) फिकट भगव्या रंगाचा असतो आणि त्यावर जागोजागी एकूण  काळ्या रंगाचे 12 ठिपके असतात.

           उपद्रवी कीटक फिकट हिरव्या रंगाचा असतो त्यावरही काळे ठिपके असतात पण ते त्रिकोणी किंवा इतर आकाराचे असतात.तसेच काही वेळा कडेने काळपट गडद रेशासुध्दा पहायला मिळतात.म्हणून मित्र व शत्रू किडींमधील फरक ओळखू शकतो.

 

*लेडी बर्ड बिटल संवर्धन*

●आंतर पीक म्हणून कोथिंबीर किंवा बडीशेप ची लागवड करावी ही पिके नैसर्गिकरीत्या या मित्र किडीस आकर्षित करतात.

●शेतात अतिविषारी कीटकनाशके फवारू नयेत.

●एकात्मिक किट व्यवस्थापन पद्धती मध्ये मित्रकिडींचा वापर महत्वाचा असतो,तरीसुद्धा किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या वर जातेय अस जाणवले आणि कीटकनाशक फवारणीची गरज भासली तर सुरवातीस निम 5% तेलाचा वापर करावा,

●नंतर 0.02%डायक्लोरोव्हस किंवा क्लॉरोपायरीफॉस0.05% किंवा फिश ऑइल,यांची फवारणी करावी.


अशाच नवनवीन अपडेट्स साठी खालील लिंक क्लीक करून जॉईन व्हा

https://www.facebook.com/groups/522198518657687/


लेडी बर्ड बिटल मावा कीड खाताना


जीवनचक्र


अळी अवस्था


अळी अवस्थेत दर दिवशी 20 ते 25 मावा किडी फस्त करते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean