कीटकनाशकांपासून विषबाधा होऊ नये याची काळजी | Be careful not to get poisoned by pesticides


आपण पिकात येणाऱ्या विविध किडींसाठी अनेक प्रकारची कीटकनाशके वापरत असतो. किटकनाशक फवारत असताना आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी लक्ष्यात घेणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे कारण 2018 साली यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा किटकनाशक हाताळणी व फवारणी वेळी मृत्यू झाला.त्यामुळे कीटकनाशक हाताळणी व फवारणी काळजीपूर्वक करणे खूप महत्वाचे आहे.
  • किटकनाशक खरेदी केल्यानंतर बिल व लेबल क्लेम व्यवस्थित वाचावे.
  • फवारणीसाठी जे प्रमाणित मापक आहे त्याप्रमाणात किटकनाशक वापरावे.अतिवापर टाळावा.
  • दोन प्रकारची किटकनाशके शक्यतो एकत्र मिसळू नयेत कारण रसायन एकत्रीकरणामुळे वेगळी प्रक्रिया होऊन परिणामकारता कमी येऊ शकते,योग्य तो सल्ला घेऊन दोन कीटकनाशके एकत्र करावीत.
  • फवारणी आधी स्प्रे पंपाची तपासणी करून घ्यावी,गळके किंवा मोडके स्प्रे वापरू नयेत.
  • फवारनी सकाळी ऊन कमी असताना किंवा संध्याकाळी घ्यावी,भर उन्हात फवारणी करणे टाळावे.
  • कीटकनाशक नेहमी वाऱ्याच्या दिशेने फवारावे,उलट दिशेने फवारल्यास हवे द्वारे कीटकनाशक नाका तोंडात जाण्याची शक्यता असते.
  • फवारणीवेळी धूम्रपान टाळावे,तसेच फवारणी बालकांवर सोपवू नये.
  • रिकामे डबे पाण्याच्या स्रोतांमध्ये फेकू नयेत,ते नष्ट करून खड्यात पुरून टाकावेत
  • किटकनाशकांचा थेट त्वचेशी संपर्क टाळावा
  • अपघाताने कपड्यावर लागल्यास किंवा शरीरावर उडाल्यास कपडे स्वच्छ धुवून स्नान करावे.
  • वर दिलेले कीटकनाशक विषजन्यता श्रेणी ओळख चिन्हे व्यवस्थित पहा.
  • विषबाधेपासून वाचण्यासाठी ह्या गोष्टी जरूर पाळा.

*एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्याशी नक्की सामील व्हा..*👇👇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊसामधील लोकरी मावा कीड । प्रभावी नियंत्रण । wooly Aphids Management

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

रसशोषक किडी । पिकाचे कसे नुकसान करतात । Damage by Sucking Pest