कामगंध सापळा (फेरोमोन ट्रॅप) | Pheromone Trap | सापळयाचे फायदे |

 🏫IPM SCHOOL🌱 



 एकात्मिक कीड व्यवस्थापनात कामगँध सापळे महत्वाची भूमिका बजावतात.जे कीटकनाशकांवर होणारा खर्च कमी करून प्रभावी किटव्यवस्थापन करतात.

 कामगंध सापळे समजून घेण्याआधी किडीचे जीवनचक्र जाणून घेतले पाहिजे. विविध किडी प्रामुख्याने पतंग-अंडी-अळी-कोष आणि पुन्हा पतंग या चार अवस्थेत आपले जीवनचक्र पूर्ण करतो. त्यामधील पतंग अवस्था सापळ्याकडे आकर्षित होते.परिणामी परिसरातील पतंग मोठ्या प्रमानात पकडून पुढे घातली जाणारी अंडी थांबवली जातात.


👇कामगंध सापळ्यात दोन महत्वाचे भाग असतात👇

●ल्युर

●सापळा


●ल्युर:-किडीचे पतंग विरुद्धलिंगी पतंगासोबत संवाद साधण्यासाठी विशिष्ट प्रकारचा वास आपल्या शरीरातून सोडतात. तोच वास कृत्रिम रित्या एखाद्या रबर,प्लास्टिक ट्यूब किंवा लाकडी ब्लॉक मध्ये समाविष्ट करून त्या किडीस आकर्षित केले जाते.अश्या वस्तुंना ल्युर(प्रलोभन) म्हणतात.

 *ल्युर मध्ये नेहमी मादी पतंगाचा वास असतो,परिसरातील सर्व नर पतंग त्या वासाकडे आकर्षित होऊन सापळ्यात  अडकतात परिणामी त्याचे मादीसोबतचे मेटिंग थांबते.*

 *एक मादी एकावेळी 250-300 अंडी देते व आपल्या जीवनात 1000-1500 इतक्या मोठ्या प्रमानात अंडी देते. त्यामुळे एक पतंग जरी पतंग आपण सापळ्यात पकडला तर पुढे होणाऱ्या 1000 ते 1500 अळ्या नियंत्रित करत असतो.

सापळा:-सापळे विविध प्रकारचे असतात.ल्युर कडे आकर्षित झालेले पतंग पकडायचे महत्वाचे काम सापळे करतात.


कामगंध सापळे हे प्रत्येक किडीसाठी वेगवेगळे असतात.पिकामध्ये सर्वसाधारण येणाऱ्या किडीचा अभ्यास करून सुरवातीपासून सापळे लावावेत कारण हे प्रतिबंधक उपायांमध्ये येतात.म्हणजेच शेतामध्ये कीड येवू नये म्हणून आपण यांचा प्रभावी वापर करू शकतो.


एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या नवीनतम अपडेट्ससाठी आमच्याशी नक्की सामील व्हा..👇🏻👇🏻

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean