कीटकनाशकांचा PHI | पीक काढणी पूर्व प्रतीक्षाकाळ | PHI of Insecticides |



कीटकनाशकांचा PHI(पीक काढणी पूर्व प्रतीक्षाकाळ)काय असतो?तो कसा ओळखावा कीडनाशकाच्या प्रत्येक लेबल क्लेममध्ये म्हणजे त्याच्या शिफारशींच्या तक्त्यामध्ये एक कॉलम असतो तो पीएचआयचा. पीएचआय म्हणजे शेवटची फवारणी ते पीक काढणी यांच्यातील कालावधी किंवा फवारणीचा काढणीपूर्व प्रतीक्षाकाळ (PHI). कोणतेही कीडनाशक जेव्हा वापरले जाते, तेव्हा त्या संबंधित पिकावर त्याचे अवशेष हे राहतातच. मात्र हे अवशेष किती प्रमाणात राहावेत (जेणेकरून मानवी आरोग्यासाठी ते धोकादायक राहणार नाहीत) त्याची एक मर्यादा ठरवून दिली आहे. पीक काढणी करण्यापूर्वी फवारणी केव्हा थांबवावी जेणेकरून या मर्यादेपेक्षा (एमआरएल) जास्त अवशेष राहणार नाहीत, तो कालावधी किंवा दिवस म्हणजेच पीएचआय (PRE HARVEST INTERVAL). या गोष्टी देखील शेतकऱ्यांनी विचारात घ्याव्या जेणे करून कीटकनाशक अवशेष विरहित शेतीमाल उत्पादित करून त्याची गुणवत्ता व भाव दोन्ही वाढेल.

एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उन्हाळ्यामधील जमीन नांगरणी । फायदे । Benefits of Summer Ploughing

मिरची पिकामध्ये थ्रिप्स नियंत्रण । एकात्मिक व्यवस्थापन पद्धती । Thrips Management

बीजप्रक्रिया । बीजप्रक्रियेचे फायदे । Benefits of Seed Treatment |