जैविक खतांचे महत्व व फायदे | Importance and benefits of organic fertilizers
- रायझोबिअम- हे जिवाणू कडधान्य पिकांच्या मुळामध्ये स्थिर होऊन मुळांवर फिकट गुलाबी रंगाचे गाठी तयार करतात. मुळांवर वाढलेले जिवाणू हवेतील नत्रांचे स्थिरीकरण करून पिकांना उपलब्ध करून देतात. या जिवाणूचे कार्य सहजीवी पद्धतीने चालते. उदा. तूर, भुईमूग, चवळी, मूग इ.
- अझेटोबॅक्टर या जिवाणूचा उपयोग एकदल तृणधान्य पिकांसाठी केला जातो. उदा. ज्वारी, मका, बाजरी इ. हे जिवाणू पिकांच्या मुळांवर गाठी न बनवता असहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करतात. तसेच हे जिवाणू बिजांकुरण व पीक वाढीसाठी उपयुक्त अशा काही रसायनांचा स्त्राव करतात जे बुरशी तसेच कृमीनाशक म्हणून काम करतात.
- असिटोबॅक्टर- हे जिवाणू मुख्यतः ऊस व इतर शर्करायुक्त पिकांसाठी जैविक खत म्हणून वापरतात येते. हे जिवाणू उसाची मुळे व इतर भागात वाढून नत्र स्थिरीकरण करतात. हे जिवाणू आंतरप्रवाही पद्धतीचे आहेत. हे खत प्रत्येकी २ किलो प्रति १०० लीटर पाण्यात मिसळवून त्यांचे द्रावण करावे व त्या द्रावणात उसाच्या कांड्या (बेणे) १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवून मग उसाची लागवड करावी.
- निळे हिरवे शेवाळ- हे शेवाळ एक विशिष्ट प्रकारचे आहे. हे हवेतील नत्र भात पिकाला उपलब्ध करून देतात. भाताच्या लागवडीनंतर १० दिवसांनी एकरी ४ किलो प्रमाणे संपूर्ण शेतात सारख्या प्रमाणात पसरवावे. एका हंगामात हेक्टरी २५ ते ३० किलो नत्र या खतातून मिळते.
- अझोला- ही एक पान वनस्पती आहेत. जी शेवाळाबरोबर सहजीवी पद्धतीने हवेतील नत्र स्थिरीकरण करते. याचा उपयोग भात खाचरात केला जातो.
*ब) व्ही.ए. मायकोरायझा:-* पाण्यातील सरीमध्ये हे जिवाणू खत एकरी २ ते ३ किलो या प्रमाणात टाकून बी पेरावे. पेरलेले बी चांगल्या प्रकारे ३ मातीने झाकावे व नंतर पाणी द्यावे. ही बुरशी झाडांना स्फुरद अन्नद्रव्य उपलब्ध करून देते. *क) स्फुरद विरघळणारे जिवाणू:-* निसर्गात स्फुरद मुक्त स्वरूपात आढळून येत नाही. परंतु खनिजे, प्राण्यांचे अवशेष, खडक इ. मध्ये आढळतो. स्फुरद विरघळणारे जिवाणू न विरघळलेल्या स्थिर स्फुरदाचे पिकांना उपलब्ध अशा रासायनिक स्वरूपात रूपांतर करतात. उदा. बॅसिलस, सुडोमोनस इ. प्रमाण- २५० ग्रॅम प्रति किलो बियाणांसाठी ४ किलो एकरी शेणखतातून, फळझाडासाठी प्रति ५० ग्रॅम. *ड) पालाश विरघळणारे व वहन करणारे जिवाणू-* वनस्पतीच्या पाणांची जाडी व खोड तसेच फांद्याच्या सालीची वाढ व बळकटीसाठी पालाश हे मुख्य अन्नद्रव्य मानले जाते. तसेच या अन्न द्रव्यामुळे वनस्पतींची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. महाराष्ट्राच्या जमिनीत पालाश या अन्नद्रव्याची मुबलकता असून ते स्थिर स्वरूपात असल्याने ते पिकांना उपलब्ध होत नाही त्यामुळे हे जिवाणू या पालाशची वहन क्रिया सक्रिय करून या अन्नद्रव्याचा पुरवठा पिकांना करतात. उदा.अॅसिडोथिओ, बॅसिलस, फेरोऑक्सिडेस.
- प्रमाण:-बीज प्रक्रियेसाठी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे. चार किलो एकरी शेणखतासाठी फळझाडे- ५० ग्रॅम प्रति झाड.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा