कीटकनाशकांचे लेबल क्लेम म्हणजे काय? | Label Claim of Pesticides |


कीटकनाशक किंवा तणनाशकांचे लेबल क्लेम म्हणजे काय?

जेव्हा आपण एखादे किटकनाशक, तणनाशक किंवा बुरशीनाशक जेव्हा खरेदी करतो. तेव्हा त्याच्यासोबत एक माहितीपत्रक सोबत जोडलेले असते. त्या माहितीपत्रकावर त्याचे मार्केट नाव, रासायनिक संरचना,मुख्यतः कोणत्या पिकावर वापरायचे, कोणत्या किडीवर नियंत्रण मिळवते, आंतरप्रवाही, स्पर्षजन्य, पोटविष यापैकी कोणत्या प्रकारात मोडते. फवारणी नंतर किती कालावधी नंतर पीक काढणी करावी(PHI). ही सर्व माहिती त्यावर दिलेली असते. तर लेबल क्लेम म्हणजेच काय उत्पादित किटनाशक कोणत्या पिकासाठी, कोणत्या किडीसाठी, किती प्रमाणात शिफारसीत आहे याचे प्रमाणपत्र होय,ज्यावरून वापरकर्त्यास उत्पादनाची हमी व पडताळणी करता येते.

लेबल क्लेम मंजूर कोण करते?

एखादे नवीन कीटनाशक संशोधित होते तेव्हा त्या रसायनाची सर्व स्तरावर चाचण्या पार पडतात व वर्षातील विविध हंगामात पडताळणी होते,या चाचण्या व्यतिरिक्त पर्यावरणासाठी हे उत्पादन किती सुरक्षित आहे या त्याच्या विषारीपणाबाबतीत चाचण्या घेतल्या जातात.त्यानंतर अहवाल केंद्रीय कीटनाशक मंडळ आणि नोंदणी समिती,फरीदाबाद,हरियाणा या केंद्रीय पडताळणी मंडळाकडे सादर केला जातो. तिथे विविध कसोटीवर या किटनाशकाचा फेरतपासणी होऊन कीटकनाशकांच्या विक्रीला कायदेशीर व अधिकृत मंजुरी दिली जाते.

उदाहरण:-

एखादी कंपणी क्लोरॅट्रिनिलीप्रोल 18.5% या कीटकनाशकाचा डोस वांग्यातील शेंडे आणि फळ अळीसाठी हेक्टरी 750 लिटर पाण्यात 200 मिली असे आहे, तर क्लोरॅट्रिनिलीप्रोल18.5% या कीटकनाशकाचे शेंडे आणि फळ अळी साठी लेबल क्लेम आहे असा होतो. तर विविध भागात,विविध हंगामात घेतलेल्या चाचण्यावरून हे लेबल क्लेम निश्चित होते. लेबल क्लेम असलेल्या पिकावरच व शिफारशीत प्रमानातच कीटकनाशकांचा वापर करावा.

लेबल क्लेममुळे काय फायदे होतात?

  • शेतकऱ्याला त्या उत्पादनाच्या गुणवत्तेविषयी
  • कायदेशीर हमी वा संरक्षण मिळते.
  • देशभरात विविध ठिकाणी (कृषी विद्यापीठे वा संशोधन संस्था) संबंधित कीडनाशकाच्या चाचण्या घेतलेल्या असतात, त्यामुळे सर्वत्र त्याची जैविक क्षमता तपासून मगच त्याची अधिकृतरीत्या ती शिफारस असते.
  • लेबल क्लेमद्वारे संबंधित कीडनाशकाची केवळ मात्रा वापरण्याची वेळ निश्चित होते असे नाही, तर संबंधित पीक, मानव, पर्यावरण, मित्रकीटक, जनावरे, जलाशय, मासे आदी घटकांवर कीडनाशकाच्या होणाऱ्या परिणामांच्या चाचण्या तपासलेल्या असतात. त्यानंतर ते सुरक्षित वापरासाठी घोषित करण्यात येते.
  • लेबल क्लेममधून 'पीएचआय' शेतकऱ्यांना समजून येतो, ज्यावरून पुढे 'एमआरएल' मिळवणे शक्य होते.
  • एखादे कीडनाशक वा कोणतेही रसायन आपण स्वतःच्याच निर्णयाने जर एखाद्या पिकावर वापरले, तर त्याचा त्या पिकावर किंवा पाने, कळ्या, मोहर, फळांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. लेबल क्लेम मिळालेल्या रसायनाच्या अशा चाचण्या घेतल्या असल्याने तो धोका टळला जाऊ शकतो.
  • लेबल क्लेममुळे एखाद्या रसायनाची चुकीची शिफारस करण्यास प्रतिबंध केला जाऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्याची दिशाभूल वा फसवणूक होणे टळू शकते.

संदर्भ:- 

आपणच व्हा आपल्या शेतीचे पीक संरक्षण सल्लागार

                                                                             -मंदार मुंडले

*एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्याशी नक्की सामील व्हा..*👇👇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean