वांगी पिकामधील शेंडा व फळे पोखरणारी अळी | Seed and fruit borer in eggplant crop


*शास्त्रीय नाव:- Lucinodes orbonalis*


*प्रादुर्भाव लक्षणे:-* 

•पीक वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेपासूनच या किडीचा प्रादुर्भाव होतो. 

•पतंग कोवळ्या शेंड्यावर,फळावर अंडी देतो. दोन ते तीन दिवसात त्यामधून अळी बाहेर पडते. 

•सुरवातीस अळी शेंड्यामध्ये शिरते, शेंडा आतील बाजूने पोखरते. त्यामुळे शेंडा सुकतो. 

•फळे आल्यानंतर अळी फळांचे नुकसान करायला सुरवात करते. अळी शेंड्यामध्ये आणि फळांमध्ये लपून असल्याने कीटकनाशके पोहचू नाहीत. 

• फळामध्ये अळी जसे पुढे खात जाते तशी मागे विष्ठा सोडते त्यामुळे फळ बाहेरून डागाळते. गळून पडते. शेतीमालाचा दर्जा खालावतो दर मिळत नाही. 

• किडीचे जीवनचक्र 'अंडी- अळी- कोष- पतंग' या अवस्थेतून 35-50 दिवसात पूर्ण होते.     


*एकात्मिक कीड व्यवस्थापन:-*


• ही कीड वांगी बटाटा पिकामध्ये येते. 

• या किडीमुळे पिकाचे ४०-५० टक्के नुकसान होवू शकते.

• लागवडीनंतर २० दिवसांनी किंवा दर आठवड्याला सुकलेले शेंडे व किडलेली  फळे आढळल्यास ती गोळा करून नष्ट करावीत. किंवा खोल खड्ड्यात पुरून टाकावी.

•किडीचे अंडीपुंज दिसताक्षणी नष्ट करून टाकावेत. 

• ट्रायकोग्रामा मित्रकीटक एकरी 100,000 या प्रमाणात सोडावीत. एका कार्डवर 18,000 - 20,000 इतके मित्रकीटक असतात. 

• नत्र युक्त खतांचा अतिवापर टाळावा, त्यामुळे किडींचे अंडी देण्याचे प्रमाण वाढते. 

• प्रभावी नियंत्रनासाठी ब्रिन्जल ल्युर व फनेल ट्रॅप एकरी 10 ते 12 या प्रमाणात लावून घ्यावेत. दर 45 दिवसांनी सापळ्यातील ल्युर बदलावी. 

• सुरवातीस फुले येईपर्यंत दर आठवड्यास निम तेल300ppm 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारावे.  

• तरीही किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळी  ओलांडतेय असं जाणवल्यास खालील कीटकनाशकांचा वापर करावा.

• सायपरमेथ्रिन २५ ई.सी. ५ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २०% ई.सी. २० मिली. किंवा डेल्टामेथ्रीन + ट्रायझोफॉस (संयुक्त किटकनाशक) २० मिली.प्रति 10 लिटर.

रासायनिक कीटकनाशकांचा वापर करण्या आधी लेबल क्लेम नक्की वाचा. 

• फक्त कीटकनाशकांवर अवलंबून न राहता या उपायांचा एकत्रित उपयोग केल्यास प्रभावी कीड नियंत्रण होते. 

स्रोत-इंटरनेट

एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

 https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean