वाळवीचे नियंत्रण आणि उपाय | Control and Remedies of Valvi

 



शेतकरी शेतात विविध पिके घेत असतो आणि पिकास विविध रोग व कीटक नुकसान करत असतात आणि त्यामध्ये वाळवी प्रमुख कीड आहे जी साधारणतः सर्व पिकांचे नुकसान करते. वाळवी हि पिकाचे मूळ खाऊन टाकते त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामधील वाळवी हि कीड जवळपास 45% पर्यंत पिकाचे नुकसान करू शकते. त्यामुळे शेतीला वाळवी किडीचा मोठा फटका बसू शकतो. 

        वाळवी कीटक जमिनीत बोगदे बनवतात आणि वनस्पतींची मुळे खातात. ही किडी प्रौढ अवस्थेत मोठी, कडक, राखाडी - तपकिरी आणि सुमारे एक मिलीमीटर लांबीचा असते. वाळवी मातीच्या दरीमध्ये किंवा पडलेल्या पानांच्या खाली लपते. शक्यतो पिकांची मुळे खाऊन पिकांचे नुकसान करतात. बटाटे, टोमॅटो, मिरची, वांगी, फुलकोबी, कोबी, मोहरी, राई, मुळा, गहू इत्यादी पिकात जास्त नुकसान करतात. 


पिकावरील लक्षणे :- 

* रुजलेल्या रोपापासून ते पूर्ण वाढीच्या पिकावर वाळवी हल्ला करू शकते. 

* किडीचा प्रादुर्भाव मुळावरच होत असल्यामुळे रोपे निस्तेज सुकलेली दिसतात.  

* रोप किंवा झाड शेंड्याकडून वरच्या बाजूने सुकत असेलेले दिसले तर असे रोप/झाड/रोप उपटून त्याच्या मुळाखाली किडीने पोकळी केलेली दिसून येते.

* रोपाची मुळे आणि खोडे पूर्णपणे पोकळ केली जाऊ शकतात. 

* काही रोपे जोरदार वाऱ्यानेहि जमीनदोस्त होतात आणि त्यावर माती पसरलेली दिसते जिच्या खाली वाळवी सापडते. 


नियंत्रण उपाय

* लागवड करताना जुन्या पिकांचे अवशेष नष्ट करा. 

* रोपांचे निरीक्षण सकाळी लवकर किंवा सध्याकाळी उशिरा करणे महत्वाचे आहे कारण दिवसा जेव्हा तापमान उच्च असते तेव्हा वाळवी जमिनीत खोल जाऊन बसते.

* प्रभावित रोपे किंवा भाग काढुन टाका.

* रोपांना पाण्याचा ताण आणि विनाकारण इजा होऊ देऊ नका. शक्य  झाल्यास लवकर काढणी करा.   

* कारण वाळवी बहुधा पक्वतेनतंर शेतान राहिलेल्या पिकावर हल्ला करते. तसेच काही वेळेला सुरुवातीपासूनसुद्धा प्रादुर्भाव दिसून येतो. 

* काढणीनंतर रोपाचे अवशेष आणि इतर कचरा काढून टाका. 

* शेत नांगरून वाळवीची वारुळे आणि भुयारे नष्ट करा ज्यामुळे त्या मुंग्या, पक्षी, यासारखा शिकाऱ्यांसाठी कीड उघड्यावर पडेल.   

* पीक फेरपालट करा  किवा आतरपिके घेत असलेल्या शेतात लागवड करा.

* रोपांचे निरीक्षण सकाळी लवकर किंवा सध्याकाळी उशिरा करणे महत्वाचे आहे कारण दिवसा जेव्हा तापमान उच्च असते तेव्हा वाळवी जमिनीत खोल जाऊन बसते.

* उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करुन जमिनीतील वाळवी नष्ट करता येते. 

* चांगले कुजलेले शेणखत वापरा तसेच गांडुळांपासून बनविलेले गांडूळखत वापरणे फायदेशीर ठरते. 

* पिकामध्ये निंबोळी पेंड प्रति हेक्टरी १० क्विंटल या प्रमाणात दिल्यास वाळवीचा प्रादुर्भाव कमी होतो. 

* निम बियांच्या टरफलांचा अर्क (NSKE) हेसुद्धा झाडांवरील आणि शेतातील पिकावरील वाळवीसाठी चांगल्या प्रकारे काम करते.

* बव्हेरिया बॅसियाना १.१५ टक्के जैवनाशक (जैविक-कीटकनाशक) @२.५ किलो प्रति हेक्टरी ६०-७५ किलो शेणखतामध्ये मिसळावे, त्यानंतर हलक्या पाण्याची फवारणी करावी व ८-१० दिवस सावलीत ठेवावे यानंतर पेरणीपूर्वी जमिनीत नांगरणी नंतर मिसळावर यामुळे वाळवी नियंत्रित होते. 

* नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा.

* आर्थिक नुकसान पातळीपेक्षा प्रादुर्भाव जास्त झाला असेल तर रासायनिक पद्धतीने नियंत्रण केले जाते यासाठी क्लोरोपायरीफॉस, डेल्टामेथ्रिन किंवा इमिडाक्लोप्रिड २० ईसी @ २.५ लिटर प्रति हेक्टर पाणी देताना पाण्यासोबत द्यावे.

स्रोत-इंटरनेट आणि अग्रोस्टार.


*उत्तर देणारे शेतकरी मित्र:-*

🌱बाळकृष्ण आंबीलढोके, कागल कोल्हापूर 

🌱 प्रदिप जाधव, पन्हाळा.

🌱 विजय गोफणे, बारामती

🌱उत्तम पाटील .करवीर

*🙏उत्तर दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏*


एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या नवीनतम अपडेट्ससाठी आमच्याशी नक्की सामील व्हा..👇🏻👇🏻

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean