नारळ शेती । नारळामध्ये येणारे रोग । Disease of Coconut Tree
नारळ हे कोकणातील तसेच सागरी किनारपट्टीवरील लोकांचे महत्त्वाचे पीक आहे. भारतात या पिकाचे उत्पादन मुख्यतः महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळची पश्चिम किनारपट्टी, तमिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांत तसेच अंदमान, निकोबार व लक्षद्वीप बेटांवर घेतले जाते. नारळाचे उत्पादन घटण्यास वेगवेगळे घटक जबाबदार आहेत त्यापैकी नैसर्गिक बदल, कीड व रोग तसेच लागवडीनंतर घ्यायची काळजी (तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, छाटणी) इत्यादी कारणे आहेत.
नारळ फळबागेमधील नुकसान करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे रोग होय. वेगवेगळे रोग लागवडीपासून ते फळ काढणीपर्यंत दिसून येतात. नारळावर आढळणारे महत्त्वाचे रोग कोंब कुजव्या, पानावरील करपा, खोड पाझरणे, तंजावर मर किंवा अळिंबी रोग, फळांची गळ इत्यादी आहेत. तर आज आपण नारळावरील येणाऱ्या रोगांची माहिती घेऊया.
*नारळावर येणारे रोग:-*
*कोंब कुज:-*
* कोंब कुजणे हा रोग लहान रोपांना झाला असेल तर लहान रोपांचे नुकतेच उमलत असलेले पान मलूल दिसते. असे पान बाहेरून हलक्य हाताने दुमडून पाहिल्यास पान नरम पडलेले दिसले तर रोगाची लागण झालेले पान हलक्या हाताने ओढून पाहिल्यास ते उपसून येते. या पानाच्या देठाला घाणेरडा वास येतो.
* नारळाचे रोप खडुष्यात लावताना त्या रोपाचा फक्त नारळच जमिनीत् पुरावयाचा असतो. नारळाबरोबर रोपाचे खोड जमिनीत पुरावयाचे नसते म्हणजेच नारळाचे रोप खोलवर लावायचे नसते.
* जर नारळाबरोबर रोपाचे खोड जमिनीत पुरले गेले असेल तर हा रोग होण्याची दाट शक्यता असते या रोपाच्या नारळाबरोबर खोडाचा काही भाग जमिनीत पुरला गेला असेल अशा रोपाच्या कोंबात पाण्याबरोबर मातीचे सूक्ष्म कण पानाच्या बगलेतून जातात.
* या मातीच्या कणांबरोबर बुरशीचे कण देखील असतात. वा-याने जातात. त्यामुळे कोंबाला जखमा होतात. या जखमांमधून बुरशीचे कण् आत जातात आणि कुजण्याची क्रिया सुरू होते. मोठ्या माडास हा रोग झालेला असल्यास नुकतेच उमलून आलेले पान कोमेजते व लूळे पडते. वाऱ्याची जराशी झुळूक जरी आली तरी ते वेडेवाकडे हलत राहते. रोग प्रादुर्भाव जास्त झाला असेल तर पान मोडून पडते.
*पानावरील करपा:-*
* करपा या रोगामुळे माडाची पाने करपतात.
* हा रोग पेस्टॉलोशिया पार्लमेव्होरा नावाच्या बुरशीमुळे होतो.
* या रोगाचा प्रादुर्भाव भारतातील सर्वच नारळ पिकविणा-या प्रांतात आढळून येतो. हा रोग उत्पादनाच्या दृष्टीने विशेष नुकसानकारक नाही.
* रोगाची तीव्रता ही दुर्लक्षित बागांमध्ये योग्य प्रमाणात खते इत्यादी न दिल्यास जास्त प्रमाणात आढळते.
* रोगग्रस्त नारळाच्या पानांवर पिवळसर तपकिरी रंगाचे असंख्य ठिपके पडून पाने पिवळसर दिसतात. ठिपक्यांचा मध्य भाग कालांतराने करड्या असंख्य ठिपके तयार होऊन ते एकत्र मिसळतात आणि त्यांचे रुपांतर मोठ्या चटयांमध्ये होते. कालांतराने रोगग्रस्त पाने संपूर्णत: करपतात आणि सुकतात.
* यामुळे माडाच्या वाढीवर परिणाम होतो. दुर्लक्षित भागात खते मुख्यतः पालाश खते, पाणी इत्यादी व्यवस्थित न दिल्यास या रोगामुळे उत्पादनात घट येऊ शकते.
*खोड पाझरणे:-*
* रोगग्रस्त माडांच्या खोडांवरील भेगांवाटे काळसर तपकिरी रंगाचा चिकट द्राव ओघळतो. हा द्राव तेथेच वाळून डिंकासारखा काळा पडतो.
* असे छोटे छोटे पट्टे एकत्र येऊन मोठे पट्टे तयार होतात व रोगाचे प्रमाण वाढल्यास असे खोडाच्या तळाशी असलेले पट्टे खोडाच्या वरच्या भागात वाढत जातात. रोगाचे प्रमाण आणखी वाढल्यास पानांचा आकार लहान होतो, त्यामुळे गळ होऊन उत्पादनात घट होते.
* प्रादुर्भावामुळे खोड शेंड्याकडे निमुळते होते व काही वर्षात झाड मरते.
*फळांची गळ:-*
* काही वेळा फायटोप्थोरा या बुरशीमुळे फळगळ होते.
* यामध्ये सुरवातीस छोट्या नारळ फळांवर देठाजवळ रोगग्रस्त ठिपके दिसतात व त्यानंतर तो भाग कुजतो व फळगळ होते.
* सुरवातीला झाडांना फळ धरण्यासाठी मादी फुलांना नरफुलांतील पुंकेसर न मिळाल्याने फळांची नैसर्गिक गळ देखील होते.
*तंजोर विल्ट/मर रोग:-*
* हा बुरशीजन्य रोग आहे. कारक जीव म्हणजे गॅनोडर्मा ल्युसिडेम आणि गॅनोडर्मा ऍप्लानॅटम हे आहेत.
* या रोगाची सुरुवातीची लक्षणे पाने कोमेजून जाणे, पिवळी पडणे अशी दिसून येतात.
यानंतर खोडाच्या पायथ्याशी असलेल्या भेगांमधून लालसर तपकिरी द्रव बाहेर पडतो आणि वरच्या दिशेने पसरतो. स्त्राव झालेल्या जागेवरील ऊती स्पर्शास मऊ असतात.
* प्रादुर्भावित ऊतींचा आणि खोडाचा पायाभूत भाग सडणे, झाडाची साल ठिसूळ होते आणि अनेकदा सोलून काढली जाते, ज्यामुळे उघड्या भेगा आणि खड्डे पडतात.
* अंतर्गत ऊतींचे रंग विखुरलेले आणि विघटित होऊन एक वाईट वास उत्सर्जित करतात. खोडाच्या पायथ्याशी गानोडर्मा दिसून येतो आणि झाड शेवटी मरते.
*लीफ रॉट रोग:-*
पाने कुजणे हा रोग सामान्यतः नारळाच्या पानांवर आढळतो ज्या झाडाला मूळकूज रोगाने आधीच प्रभावित आहेत.
मूळकूज रोगाने प्रभावित झाडांच्या पानांमध्ये तपकिरी घाव दिसणे हे पहिले लक्षण आहे. हळुहळु हे डाग मोठे होतात आणि एकत्र होतात परिणामी मोठ्या प्रमाणात कुजतात. जसे पान फुटते तेव्हा लॅमिनाचे कुजलेले भाग कोरडे होतात आणि वाऱ्यात उडून जातात, ज्यामुळे पानांचा "पंखा"सारखा आकार होतो.
यासोबत काही ठिकाणी मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. सर्वसाधारण वेगवेगळ्या भागानुसार या रोगांचा प्रसार दिसून येतो. जर तुम्हाला अगदी सुरुवातीला काही लक्षणे दिसायला लागताच वेळीच उपाययोजना केल्यास शेतकऱ्याचे कमी नुकसान होऊन रोग नियंत्रणासाठी येणारा खर्चही कमी होईल. या रोगांचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल पुढील ब्लॉगमध्ये संपूर्ण माहिती देण्यात येईल.
संदर्भ- विकासपीडिया आणि TNAU ब्लॉग.
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-*
🌱प्रशांत बागल सोलापूर
🌱महादू विष्नु काकडे, जालना.
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा