NPK कंसोर्शिया जिवाणू कसे काम करते आणि त्याचे फायदे | NPK consortia bacteria work and its benefits

 





पिकांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारची अन्नद्रव्ये आवश्यक असतात. हि अन्नद्रव्ये वेगवेगळ्या रासायनिक खतांच्या माध्यमातून पिकांना पुरवली जातात. पण पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी हि रासायनिक खते पिकांना दिल्यानंतर सर्वच खते पिकांना घेता घेता येत नाही तर काही प्रमाणात ती पिकांना उपलब्ध होतात आणि बाकी शिल्लक राहिलेली रासायनिक खते अविघटनशील स्वरूपात जमिनीमध्ये तशीच पडून राहतात. 
  अशी जमिनीमधील खते पिकांना चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्यासाठी जमिनीमधील जिवाणू अहोरात्र काम करत असतात पण सध्या रासायनिक खतांच्या  अति वापरामुळे त्यांचे प्रमाण कमी झाले आहे. असे जिवाणू आपण जमिनीमध्ये दिल्यास किंवा सोडल्यास त्यांचे जमिनीतील प्रमाण वाढून दिली गेलेली खते जास्त प्रमाणात पिकांना उपलब्ध होतात. तर आज आपण पाहूया कि NPK consertia च्या माध्यमातून तीन प्रकारचे जिवाणू एकत्रितपणे कसे काम करतात आणि त्यांचे फायदे कोणते आहेत?

NPK कंसोर्शिया जिवाणू
  नत्र, स्फुरद व पालाश ही पिक वाढीसाठी लागणारी मुलभुत अन्नद्रव्ये आहेत. Jivanu NPK हा जिवाणूंचा असा एकत्रित जिवाणू संघ आहे जो अविद्राव्य स्वरुपातील नत्र, स्फुरद व पालाश विद्राव्य स्वरुपात आणून पिकांना उपलब्ध करुन देतो व पिक वाढीस आवश्यक या मुलभुत अप्रद्रव्यांची गरज भागवतो.

हे जिवाणू कसे काम करतात?
नत्र, स्फुरद, पालाश हे अनुक्रमे नायट्रोजन, रॉक फॉस्फेट, मायका या अविद्राव्य स्वरुपात असतात. हे NPK जिवाणू त्या अविद्राव्य घटकांवर प्रक्रीया करुन ते विद्राव्य स्वरुपात पिकाच्या मुळाजवळ मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देते.त्यामुळे अशी विद्राव्य स्वरूपातील उपलब्ध अन्नद्रव्ये मुळाद्वारे सहजरीत्या शोषली जातात. त्यामुळे पिक जोमाने वाढते.

फायदे:-
• Jivanu NPK हे जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची उपलब्धता
साधारणपणे २५-३५% पर्यंत वाढवते.
• बियान्यांची उगवण क्षमता वाढवते.
• पिकाची जोमदार वाढ हते त्याचबरोबर पिकाची काळोखी, फुटव्यांची संख्या आणि फुल व फळधारणेतही वाढ होते.
• पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते.
• रासायनिक खतांचा वापर कमी होऊन खर्चात बचत होते.

वापर कसा करावा?
या जिवाणूंचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. त्यात प्रामुख्याने चांगल्या कुजलेले 
शेण खत 200 किलो घेऊन त्यामध्ये हे NPK कंसोर्शिया जिवाणू 500 ग्रॅम मिसळून आपण एक एकर जमिनीमध्ये ओलावा असताना टाकू शकतो. 
• तसेच आळवणी साठी 500 ग्रॅम प्रति 200 लीटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आळवणी एक एकर क्षेत्रासाठी करू शकतो. 
• या जिवाणूंचा वापर बीजप्रक्रियेसाठी 5 ग्रॅम जिवाणू प्रति किलो बियाणे (पेस्ट) वापर करू शकतो. 

वापरताना काय काळजी काय घ्यावी?
• जिवाणूंचा वापर शक्यतो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी करणे गरजेचे आहे. 
• ज्यावेळी जिवाणूंचा वापर करायचा आहे अश्यावेळी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. 
• हे जिवाणूंचे पॅकेटची थंड व कोरड्या ठिकाणी साठवणूक करावी.
• एकदा पॅकेट कापल्यानंतर संपूर्ण पॅकेट एकाचवेळी वापरावे. 
• हे जिवाणू वापरताना उपयोगात येणाऱ्या वस्तू स्वच्छ असाव्यात. 

  अश्या प्रकारच्या जिवाणूंचा वापर आपण सर्व प्रकारचा भाजीपाला, नगदी पिके तसेच फळपिकामध्येही करू शकतो. सर्वच पिकामध्ये जिवाणूंचा वापर केल्यास रासायनिक खतामध्ये साधारण ५०% बचत होते. तसेच या जिवाणूंचा वापर केल्यामुळे जमिनीमध्ये जिवाणूंची संख्या वाढते, पिकांची चांगल्या प्रकारे वाढ होऊन उत्पन्न वाढते तसेच रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी केला जातो.



*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-* 

🌱सचिन तुकाराम सावंत,सांगली

*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*


.*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in


 *Join Us On Social Media Also👇* 


*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS


 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1


*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR


*Linkedin:-* 

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/

#ipm_school #IPM #gogreen #nitrogen #fertilizer #symptoms #smartfarmer #farmingtips #farming

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean