सोयाबीनचे वाण व त्यांची वैशिष्ट्ये | Soybean varieties and their characteristics
खरीप हंगाम सुरू होणार असून खरीप हंगामात देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन लागवड केली जाते. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि इतर काही राज्यांमध्येही अनेक भागात सोयाबियाची लागवड केली जाते. खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी आपली शेतं तयार करून पावसाची वाट पाहत आहेत.
चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात चांगल्या वाणांची निवड, किडी व्यवस्थापन, रोगांचे व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन यांचाही समावेश आहे. परंतु सर्वप्रथम शेतकऱ्यांनी चांगल्या वाणांची निवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले पीक घेता येईल. तर आज आपण जाणून घेऊया की या खरीप हंगामात चांगले उत्पादन देणारे वाण कोणते आहे
1.फुले संगम (के.डी.एस.-७२६) : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे २०१७-१८ साली
प्रसारित झालेले, १०५-११० दिवसांत परिपक्व होणारे, जाड दाणा, भारीजमीन व चांगले व्यवस्थापन असेल तर अतिशय चांगले उत्पादन देणारे वाण. लागवडीसाठी ४५ x ८-१० सेंमीअसेअंतर ठेवावे. जाड व चमकदार दाणा. सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी २५-३० क्विंटल.
2.फुलेकिमया(के.डी.एस.-७५३) : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे २०१९-२० साली प्रसारित झालेले, १००-१०५दिवसांत परिपक्व होणारे वाण, जाड व चमकदार दाणा, अतिशय चांगलेउ त्पादन देणारे वाण, ४५ x ७-१० सेंमीवर लागवड करावी, सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी २७ ते ३२ क्विंटल.
3.फुलेदुर्वा(के.डी.एस. ९९२) : २०२१ मध्ये प्रसारित, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेशआणि तामिळनाडू या राज्यांसाठी शिफारसीत मध्यम कालावधीचे (९५ ते१०० दिवस.) वाण. उंची१.५-२ फूटापर्यंत असून, खोडाची जाडी जास्त असल्याने फांद्यांची संख्या जास्तअसते. पाने थोडी त्रिकोणी, फिक्कट हिरवी, चार पानाचे प्रमाण मध्यम, ३ पाने संख्या जास्त प्रमाणात दिसून व पाने थोडी वरती वाढलेली दिसतात. खोडावर व शेंगेवर लव थोड्या प्रमाणात असते.एकाठिकाणी शेंगांची संख्या ५-६ म्हणजे इतर वाणांच्या तुलनेत जास्त दिसून येते. तांबेरा रोग, खोडमाशी किडीस प्रतिकारक्षम. योग्यव्य वस्थापनात हेक्टरी सरासरी २७-३५ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.
4. एम.ए.यु.एस.७२५ : २०२२-२३ मध्ये प्रसारित, महाराष्ट्र व जवळच्या राज्यांसाठी शिफारसीत लवकर (९२ ते९५दिवस) येणारे वाण. उंची१.५ फूटापर्यंत, पाने लांब त्रिकोणी, गडद हिरवी, खोडावर व शेंगेवर ही लव. शेंगांची संख्या जास्त, शेंगामध्ये चार दाणे असल्याने दाणे थोडे लहान आणि चकाकदार असतात. खोडमाशी, चक्रीभुंगाकिडीस प्रतिकारक्षम. भारी, मध्यम आणि हलक्याअशा तीनही जमिनीत योग्य व्यवस्थापनात अतिशय चांगलेउत्पादन २२ ते२७ क्विंटल प्रती हेक्टर शक्य.
5. जे. एस.-९३०५ : २००२ साली प्रसारित, ८५-९० दिवसांत परिपक्व होणारे लवकर येणारे वाण, हलकी व मध्यम जमीन, तसेच ३०-३८ सेंमीx ६-८ सेंमी अशी लागवड करावी. सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी २०-२५ क्विंटल.
6. जे. एस.-३३५ : १९९४ मध्ये प्रसारित झालेलेअतिशय लोकप्रिय असेवाण. ९५-१०० दिवसांत परिपक्वता, ३८ x १०सेंमीअंतरावर मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य. सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी २५ -२८ क्विंटल.
7. जे. एस. -२०९८ : २०१७-१८ साली प्रसारित झालेले, उंच वाढणारे असून हार्वेस्टरने काढणीस योग्य वाण, ९५-९८ दिवसांत परिपक्वता, हेक्टरी सरासरी २५-२८ क्विंटल उत्पादन.
8. जे.एस.-९५६० : लवकर येणारे (८२-८८ दिवस ) चार दाण्याच्या शेंगा. दुष्काळ सदृश्य परिस्थितीत चांगले उत्पादन देणारे वाण.
9. एम.ए.यु.एस.-७१ (समृद्धी) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथून २०१० साली प्रसारित.९५-१०० दिवसांत परिपक्व होणारे, चांगले उत्पादन देणारे वाण, मध्यम ते भारी जमीनीत लागवडीसाठी योग्य.सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी २८-३० क्विंटल.
10. एम.ए.यु.एस.-१५८ : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथून २०१० साली प्रसारित झालेले, ९३-९८ दिवसांत परिपक्व होणारे, हलक्या व मध्यम जमीनीत लागवडीसाठी योग्य. सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी २६-३१ क्विंटल.
11.एम.ए.यु.एस.-६१२ : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथून २०१६ साली प्रसारित. ९४-९८ दिवसांत परिपक्वता. उंच वाढ, वातावरण बदलामध्ये तग धरणारे वाण, सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी३०-३२क्विंटल. दुष्काळ सदृश्यपरीस्थिती व आंतरपीक पद्धतीसाठी योग्य वाण.
12. एम.ए.सी.एस -१४६० : ९५ दिवसांत परिपक्वता. होणारे व चांगले उत्पादन देणारे वाण ,सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी २५-३० क्विंटल. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये चांगले उत्पादन देण्याची क्षमता. कीड व रोगास कमी प्रमाणात बळी पडतो.
13. एम.ए.सी.एस-११८८ : १०० दिवसांत परिपक्व होणारे, चांगले उत्पादन देणारे वाण, सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी २५-३० क्विंटल.
14. एन.आर.सी.-३७ (अहिल्या-४) : २०१७ मध्ये भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर येथून प्रसारित. मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांसाठी शिफारसीत, ९६-१०२ दिवसांत परिपक्व होणारे वाण. सरासरी उत्पादन ३५-४० क्विंटल प्रती हेक्टर.
15. एन.आर.सी.-१५७ : २०२१-२२ मध्ये भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर येथून प्रसारित. उशिरा (२० जुलैपर्यंत) लागवडीसाठी शिफारसीत, ९४ दिवसांत परिपक्व होणारे वाण. सरासरी उत्पादन १६-२० क्विंटल प्रती हेक्टर.
16. एन.आर.सी.-१३८ (इंदोर सोया१३८) : २०२१ मध्ये भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर येथून प्रसारित. तांबेरा आणि पिवळा मोझ्याक रोगास प्रतिकारक्षम, ९०-९४ दिवसांत परिपक्वता. सरासरीउत्पादन २५-३० क्विंटल प्रती हेक्टर देणारे वाण.
17. एन.आर.सी.-१४२ : ९८ दिवसांत परिपक्व होणारे, ३२ क्विंटल प्रती हेक्टर सरासरी उत्पादन देणारे वाण, दाणा जाडआणि चकाकदार.
18. एन.आर.सी.-१८८ : हिरव्या शेंगा खाणे व भाजी योग्य नवीन सोयाबीन वाण. हिरव्या शेंगाचे उत्पादन ४०-४५ क्विंटल प्रती एकर.
19.आर.व्ही.एस.एम.-२०११-३५ : ९४-९६ दिवसांत परिपक्व होणारे, यलोमोझॅक, चारकोलरॉट या रोगास प्रतिकारक्षम.शेंगा फुटण्यास प्रतिकारक, तीन - चार दाण्याच्या शेंगा. दाणा जाड, चकाकदार. सरासरी उत्पादन : २५-२८ क्विंटल प्रती हेक्टर.
स्रोत-इंटरनेट
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-*
🌱 सयाजीराव गोपाळराव पोखरकर,अहमदनगर
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा