भात पिकामधील चारसूत्री लागवड पद्धती । Paddy Plantation ।
खरीप हंगामामधील प्रमुख पिकांपैकी एक भात पीक आहे. महाराष्ट्रात कोकण विभागात सर्वांत जास्त प्रमाणात भाक पीक केले जाते. पण त्याबरोबरच इतर भागातही कमी जास्त प्रमाणात भात पिकाचे उत्पादन घेतले जाते.
काही भागात भाताचे टोकन पद्धतीने लागण केली जाते तर काही भागामध्ये रोपे तयार करून रोपलागण पद्धतीचा वापर करून भाताची लागण केली जाते. काही आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पद्धतींचा वापर केल्यास शेतकरी नक्कीच चांगले उत्पन्न घेऊ शकतात.
*चारसूत्री लागवड पद्धती:-*
हि लागवड पद्धती कै.डॉ. नारायण सावंत यांनी एकात्मिक सेंद्रिय रासायनिक तंत्रज्ञानावर आधारित तयार केली आहे. या पद्धतीमध्ये अवशेषांचा वापर, हिरवळीच्या खतांचा वापर, रोपांमधील अंतर आणि रासायनिक खतांच्या गोळ्यांचा वापर या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो.
*सूत्र 1 - अवशेषांचा वापर*
भाताच्या तुसाची काळी राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी मिसळावी. पहिल्या नांगरणीच्या वेळी हेक्टरी अंदाजे दोन टन भाताचा पेंढा लावणीपूर्वी शेतात गाडावा. त्यामुळे पालाश 20-25 किलो आणि सिलिकॉन 120 किलो उपलब्ध होते. रोपे कणखर होऊन खोडकिडीला प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.
*सूत्र 2 - हिरवळीचे खतांचा वापर*
प्रति गुंठा गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) झाडाची 30 किलो पाने चिखलणीपूर्वी सात ते आठ दिवस अगोदर पसरावीत. त्यामुळे भात रोपांना सेंद्रिय नत्र हेक्टरी 10 ते 15 किलो उपलब्ध होते. तसेच उंदरांचा प्रादुर्भाव कमी होतो.
*सूत्र 3 - नियंत्रित लावणी*
- नियंत्रित लावणी करावयाच्या सुधारित दोरीवर 25 सें.मी. व 15 सें.मी. आलटून (25-15 बाय 25-15-सें.मी.) अंतरावर खुणा कराव्यात. सुधारित लावणी दोरीवर 15 सें.मी. अंतरावर असलेल्या (प्रत्येक दोन ते तीन रोपे/चूड) प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. त्यानंतर अंदाजाने 15 सें.मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा. अशा प्रकारे एकावेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे. त्यानंतर मार्गदर्शक वापरून 40 सें.मी. दोरी मागे सरकवावी. पुन्हा जोड-ओळ पद्धत (चार चूड) वापरून खाचरातील नियंत्रित लावणी पूर्ण करावी. खाचरात 15 x 15 सें.मी. चुडांचे चौकोन व 25 सें.मी. चालण्याचे रस्ते तयार होतात.
- लावणी करताना प्रत्येक चुडात दोन ते तीन रोपे सरळ व उथळ (दोन ते चार सें.मी. खोलीवर) लावावीत. संकरित भातासाठी एका ठिकाणी एक रोप लावावे.
*सूत्र 4. युरिया-डीएपी ब्रिकेटचा वापर*
नियंत्रित लावणीनंतर त्याच दिवशी प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात मधोमध सरासरी 2.7 ग्रॅम वजनाची (युरिया-डीएपी) एक ब्रिकेट (खताची गोळी) हाताने सात-10 सें.मी. खोल खोचावी. एक गुंठे क्षेत्रासाठी 625 ब्रिकेट (1.75 कि.ग्रॅ.) लागतात.
या पद्धतीचा वापर केल्यामुळे अवशेषांचा वापर करून चांगले खत मिळवता येते. तसेच हिरवळीच्या खतांचा वापर केल्यामुळे सुरुवातीला पिकाला अन्नद्रव्ये भागवली जाते. त्याच पद्धतीने सामान अंतरावर लागवड केल्यामुळे सर्व रोपांची वाढ चांगली होऊन चांगले पीक येते. आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे ब्रिकेटचा वापर केल्यामुळे खताचा उपयोग पिकाला होऊन त्याचा अपव्यय टाळता येतो. तर या चारसूत्री पद्धतीचा उपयोग भाताचे पीक करणाऱ्या शेतकऱ्यांनी करून आपले भाताचे उत्पन्न वाढवावे.
स्रोत-विकासपीडिया
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-*
🌱सुनील कुलकर्णी, बिदर कर्नाटक
🌱भागीनाथ आसने, अहमदनगर
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipm_school #IPM #gogreen #rice #paddy #sowing #transplanting #farmer #paddygrower #paddyfarmer #ricetechnique #smartfarmer
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा