हुमणीचे एकात्मिक कीड व्यवस्थापण | White Grub IPM
"IPM SCHOOL" *हुमणीचे एकात्मिक कीड व्यवस्थापण* हुमणी ही महाराष्ट्रासह देशभरातील पिकावर उपजीविका करणारी विध्वंसक कीड आहे.हुमणीची अळी अवस्था सर्वात धोकादायक असते. शास्त्रीय नाव :- Holotrichia consanguinea :-Holotrichia serrata वरील दोन्ही प्रजाती महाराष्ट्रासह देशभरात आढळतात. प्रादुर्भावित पिके :-ऊस,भुईमूग, मिरची,पेरू,नारळ,तंबाखू, बटाटा,सुपारी,इ.तेलबिया, डाळवर्गीय आणि भाजीपाला पिके. जीवनचक्र:- ही कीड इतर कीटकांप्रमाणे अंडी,अळी,कोष आणि भुंगा अश्या चार अवस्थेतुन आपले जीवनचक्र पूर्ण करते. या कीटकाचे जीवन 10 ते 12 महिन्यांत पूर्ण होते.म्हणजेच एका वर्षी हुमणीची एकच पिढी जन्माला येते. *अंडी:-* मादी भुंगे मिलनानंतर अंडी घालतात. लवकर सकाळच्यावेळी अंडी देतात.दुधी पांढऱ्या रंगाची अंडी असतात.एकावेळी मादी 60 ते 70 अंडी देते.त्यामुळे या किडीची संख्या भराभर वाढते. *अळी(हुमणी) :-* 8 ते 10 दिवसात अंड्यातुन दुधी पांढऱ्या रंगाची हुमणी बाहेर पडते.इंग्रजी "C" आकारात हुमणी असते.हुमणी आपल्या चार अवस्थेतुन मोठी होते.त्यातील शेवटच्या तीन अ...