भुईमूग पानावरील टिक्का रोग | Groundnut leaf tick disease

 

फोटोमधील भुईमूगावरील *ही* लक्षणे *टिक्का (पानावरील ठिपके)* या रोगाची आहेत. टिक्का रोग हा भुईमुग पिकावरील अतिशय महत्वाचा रोग असून या रोगाचा प्रादुर्भाव संपूर्ण भारत तसेच जगातील सर्व भुईमुग उत्पादक देशात आढळून येतो. टिक्का रोग हा दोन प्रकारच्या बुरशीमुळे होतो. भुईमुग पेरणीनंतर १ महिन्यानंतर या रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येतो. पानांवर लहान गर्द रंगाचे ठिपके आढळून येतात. कालांतराने हे ठिपके मोठे होऊन एकमेकांत मिसळून आकारहीन गर्द तपकीरी रंगाचे होतात. हे ठिपके सरकोस्पोरा पर्सोनाटा या बुरशीमुळे होतात. तसेच सरकोस्पोरा अरबीडीकोला या बुरशी मुळे होणारे ठिपके आकाराने मोठे असतात. ठिपक्याचा रंग गर्द असून त्या भोवती पिवळया रंगाचे गोलाकार कडे आढळुन येते. दोन्ही ठिपक्याचा प्रादुर्भाव पिक फुलोरा आणि आऱ्या लागण्याचे वेळेस होतो. *एकात्मिक व्यवस्थापन:-*
  1. रोगाची लक्षणे दिसून येताच रोगग्रस्त पाने तोडून शेताबाहेर टाकावीत.
  2. रोगसहनशील वाणांची लागवडीसाठी निवड करावी.
  3. पुन्हा-पुन्हा भुईमूग पीक घेणे टाळावे.पीक फेरपालटणी करावी. जेणे करून या काळामध्ये रोगाचे बीजाणू निष्क्रीय होतील.
  4. उन्हाळी भुईमूग घेतला असल्यास पुन्हा त्याच शेतामध्ये खरिपात भुईमूग घेणे टाळावे.
  5. रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब २० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा टेब्युकोनाझोल १० मि.ली. १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  6. फवारणी आधी बुरशीनाशकांचे लेबल क्लेम नक्की तपासा.

*उत्तर देणारे शेतकरी मित्र:-*

🌱प्रदीप जाधव, पन्हाला

🌱हिवाजी चिउगले, राधानगर, कोल्हापुर

🌱केशव ढोले इंदापुर

🌱स्वप्निल कदम, परभणी

🌱गंगादेर मुकादम नांदेड़

🌱भागीनाथ आसने, अहमदनगर

🌱तांडले पुंडलिक कालियास, देवांगर

🌱गजानन विठ्ठलराव माने,दातेगाव ,हिंगोली

*🙏उत्तर दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏*

*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in


 *Join Us On Social Media Also👇* 


*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS


 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1


*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR


*Linkedin:-* 

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस पिकाचे विविध वाण व त्यांची वैशिष्टे | Different Varieties of Sugarcane Crop and their Characteristics

ऊस लागवड करताना उसाची बीजप्रक्रिया कशी करावी | How to process sugarcane seeds while planting sugarcane

वांग्याची झाडे झुडुपासारखी होण्याची कारणे | Reasons for brinjal plants becoming bushy