पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऊसाची उन्हाळ्यातील उशिरा लागण । घ्यावयाची काळजी । Precautions for Late planting of Sugarcane

इमेज
  फेब्रुवारी-मार्च महिन्यात केली जाणारी उसाची लागण ही 'सुरू' हंगामातील लागण मानली जाते. या काळात तापमान वाढू लागलेले असते, त्यामुळे जमिनीतील ओलावा लवकर कमी होतो. या उशिराच्या लागणीत जास्तीत जास्त फुटवा आणि जोमदार वाढ मिळवण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.  घ्यावयाची काळजी:- १. योग्य वाणाची निवड:- * उशिरा लागण करताना लवकर पक्व होणारे आणि उष्णतेला दाद देणारे वाण निवडावेत. * शिफारस केलेले वाण: को. ८६०३२ (नीरा), को.व्ही.एस.आय. ०३१०२, को.एम. ०२६५ (फुले २६५). *ऊस बेणेची निवड करताना ताज्या आणि रसरशीत बेण्याचा (१०-११ महिने वयाचा ऊस) वापर करावा. २. बेणे प्रक्रिया (Seed Treatment):-  * ऊसाची लागण करताना बेणे प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे.  * उन्हाळ्यामुळे उसाचे डोळे मरण्याची शक्यता असते, म्हणून बेणे प्रक्रिया चुकवू नका.  * बुरशीनाशक: १०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम कार्बेंन्डाझिम मिसळून बेणे १० मिनिटे बुडवून ठेवावे. हे सुरुवातीच्या अवस्थेत रोगापासून संरक्षण करते.  * कीटकनाशक: खोडकिडीच्या प्रतिबंधासाठी याच द्रावणात क्लोरोपायरीफॉस किंवा इमिडाक्लोप्रीड मिसळावे. * जिवाणू संव...