पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आंबा फळगळ समस्या । कारणे आणि उपाय । Mango Fruit Dropping Problem & Solutions

इमेज
आंबा पिकातील फळगळ ही बागायतदारांसमोरील एक मोठी समस्या आहे. मोहोर लागल्यापासून ते फळ काढणीपर्यंत विविध टप्प्यांवर फळगळ होऊ शकते. वेळीच उपाययोजना केल्यास हे नुकसान टाळता येते. आंबा फळगळीची प्रमुख कारणे पाण्याचा ताण: - कडक उन्हाळ्यात जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे किंवा अनियमित पाणी पुरवठ्यामुळे झाड फळे गाळून टाकते. अन्नद्रव्यांची कमतरता:- प्रामुख्याने बोरॉन, झिंक आणि नत्र यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे फळांची देठं कमकुवत होतात. हवामानातील बदल:- अचानक वाढलेले तापमान, उष्ण वारे (लू) किंवा ढगाळ हवामान यामुळे फळगळ वाढते. कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव(तुडतुडे):- हे फळांतील रस शोषतात, ज्यामुळे फळे गळतात. भुरी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव:- या रोगांमुळे फळांच्या देठावर जखमा होतात. संप्रेरकांचे असंतुलन: झाडातील नैसर्गिक संजीवकांचे प्रमाण कमी झाल्यामुळे 'अ‍ॅबसिसिक ॲसिड' तयार होते, जे फळगळीला कारणीभूत ठरते. परागीभवन : परागीभवन योग्य प्रकारे न झाल्यास फळांची वाढ खुंटते आणि ती गळून पडतात. फळगळ थांबवण्यासाठी उपाययोजना १.पाणी व्यवस्थापन: -  *फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर झ...