पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

केळीमध्ये येणारा कुकुम्बर मोझॅक व्हायरस(CMV) | Cucumber Mosaic Virus | केळी पिकामध्ये येणार विषाणूजन्य रोग

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱 केळीमध्ये येणारा कुकुम्बर मोझॅक व्हायरस(CMV) सध्या केळी लागवड क्षेत्रामध्ये कुकुंबर मोझॅक विषाणूचा (सी.एम.व्ही) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. ग्रामीण भाषेत याला ‘हरण्या रोग’ म्हणूनही ओळखले जाते.  कारक घटक:- सततचे ढगाळ वातावरण, अखंडित पडणारा पाऊस, कमी तापमान आणि जास्त आर्द्रता हे या रोगाच्या वाढीसाठी पोषक असतात. रोगाचा प्राथमिक प्रसार कंदापासून आणि दुय्‍यम प्रसार मावा किडीमार्फत होतो. या विषाणूचा प्रादुर्भाव विविध भाजीपाला पिकांवर देखील दिसून येतो. लागवडीनंतर २ ते ३ महिन्यात रोगाची लक्षणे दिसू लागतात. रोगाची लक्षणे ओळखून योग्य वेळी नियंत्रणाचे उपाय करावेत.  रोगाची लक्षणे:- *सुरुवातीस कोवळ्या पानांवर हरितद्रव्य विरहित, पिवळसर पट्टे दिसतात. *पानांवर १-२ अर्धवट आकाराचे किंवा पूर्ण पानभर पसरलेले पट्टे दिसतात. कालांतराने पानांचा पृष्ठभाग आकसला जाऊन कडा वाकड्या होतात. पाने आकाराने लहान होतात. *शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होते. हाताने दाबल्यास कडकड आवाज येतो. *पानांच्या शिरा काळपट पडून तेथील ऊती मरतात. पाने फाटतात. *नवीन येणारी पाने आकाराने लहान हो...

हळद पिकामध्ये रोगांचा प्रादुर्भाव होतो | Diseases occur in the turmeric crop

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱   हळद पिकामध्ये कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होतो?  उत्तर:- सध्या ऊन आणि पाऊस असे वातावरण सारखे बदलत असल्यामुळे हळद पिकावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. सध्या हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी असून, खोड व फुटव्यांची वाढ भरपूर होते. सतत पावसाची रिमझिम सुरू असल्याने वातावरणातील आर्द्रता वाढलेली आहे. या वातावरणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो.  कंदकूज (गड्डे कुजव्या) हा बुरशीजन्य रोग असून, त्याला रायझोम रॉट असेही म्हणतात. भरपूर पाऊस, भारी काळी कसदार व कमी निचरा होणारी जमीन या रोगांस पोषक असते.ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. लक्षणे:- कंदाच्या कोवळ्या फुटव्यावर लक्षणे त्वरित दिसतात. नवीन आलेल्या फुटव्याची पाने पिवळसर तपकिरी रंगाची होतात. खोडाचा रंग तपकिरी काळपट होतो. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीत कंद बाहेर काढल्यास तो पचपचीत व मऊ लागतो. त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडत असते.  नियंत्रण प्रतिबंधात्मक उपायांमध्ये जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस...