तूरीमध्ये येणारा वांझ रोग | sterility mosaic disease of pigeonpea
🏫IPM SCHOOL🌱 तूरीमध्ये येणारा वांझ रोग :- वांझ रोग या विषाणुजन्य रोगाचा प्रसार हा एरिओफीड माईट या कोळी जातीच्या कीटकांमार्फत वाऱ्याच्या दिशेने होतो. हे कोळी ‘पीजन पी स्टरिलीटी मोझॅक’ या वांझ रोगाच्या विषाणूचा प्रसार करतात. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तूर पिकात फुले व शेंगा लागत नाहीत. परिणामी उत्पादनात घट येते. त्यामुळे वांझ रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एरिओफाईड माईटचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. किडीची ओळख:- * हा कोळी जवळपास ०.२ मिमी लांबीचा असून हे कोळी साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शिकेचा उपयोग करावा लागतो. * शरीर अरुंद पांढरट लांब किंवा पिवळसर रंगाचे आणि पायांच्या दोन जोड्या असतात. * कोळी तुरीच्या पानाच्या खालील बाजूस वास्तव्य करतात. आणि पानांतील रस शोषून त्यावर उपजीविका करतात. * कोळी तुरीच्या कोवळ्या शेंगावर अंडी घालतात. अंडी, पिल्ले आणि प्रौढ असा किडीचा जीवनक्रम २ आठवड्यांत पूर्ण होतो. प्रसार:- कोळ्यांनी वांझ रोगग्रस्त झाडातील रस शोषल्यानंतर त्यांच्या सोंडेमध्ये रस राहतो. शोषलेल्या रसामध्ये वांझ रोगाचे विषाणू अस...