कुकुंबर मोझॅक व्हायरस | Cucumber mosaic virus
*कुकुंबर मोझॅक व्हायरस* सध्या केळी टोमॅटो यांसारख्या पिकावर "कुकुंबर मोझॅक व्हायरस" या खूप घातक आणि नुकसानकारक अशा रोगाचा प्रभाव दिसून येत आहे आणि त्यावर उपाययोजना करूनही होणारे पिकाचे नुकसान खूप मोठे आहे. हवामान बदल आणि येणाऱ्या नवनवीन किडी यामुळे शेतकरी त्रासून गेला आहे.पिकामध्ये कोवळ्या पानांवर तसेच फळावर याचा प्रभाव दिसून येतो. या रोगाला सी एम व्ही म्हणूनही ओळखले जाते.यामध्ये आपण सुरुवातीपासूनच एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब आपल्या शेतामध्ये केल्यास या रोगास थोपवणे सोपे होईल. *प्रभावित पिके:-* * काकडी,वेलवर्गीय फळभाज्या तसेच टोमॅटो, वांगी, मिरची, केळी अशा पिकांसह केणा, चंदनवेल अशी तणे आणि यांसारखी सुमारे ८०० वनस्पतींच्या जाती या विषाणू रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. *लक्षणे:-* * पीक वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर रोगाचे संक्रमण होऊ शकते. रोगाचे संक्रमण मुख्यत: पानांवर दिसते. * पानांचा आकार लहान होतो तसेच पानांवर लाटांसारखे पिवळसर, तपकिरी काळे पट्टे हे मुख्य शीरेला समान पडतात. * सुरवातीच्या लक्षणात सलग किंवा तुटक पट्ट्यांची ठिगळासारखी संरचना शिरांना समांतर येते. पा...