कुकुंबर मोझॅक व्हायरस | Cucumber mosaic virus
*कुकुंबर मोझॅक व्हायरस*
सध्या केळी टोमॅटो यांसारख्या पिकावर "कुकुंबर मोझॅक व्हायरस" या खूप घातक आणि नुकसानकारक अशा रोगाचा प्रभाव दिसून येत आहे आणि त्यावर उपाययोजना करूनही होणारे पिकाचे नुकसान खूप मोठे आहे. हवामान बदल आणि येणाऱ्या नवनवीन किडी यामुळे शेतकरी त्रासून गेला आहे.पिकामध्ये कोवळ्या पानांवर तसेच फळावर याचा प्रभाव दिसून येतो. या रोगाला सी एम व्ही म्हणूनही ओळखले जाते.यामध्ये आपण सुरुवातीपासूनच एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब आपल्या शेतामध्ये केल्यास या रोगास थोपवणे सोपे होईल. *प्रभावित पिके:-* * काकडी,वेलवर्गीय फळभाज्या तसेच टोमॅटो, वांगी, मिरची, केळी अशा पिकांसह केणा, चंदनवेल अशी तणे आणि यांसारखी सुमारे ८०० वनस्पतींच्या जाती या विषाणू रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. *लक्षणे:-*- * पीक वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर रोगाचे संक्रमण होऊ शकते. रोगाचे संक्रमण मुख्यत: पानांवर दिसते.
- * पानांचा आकार लहान होतो तसेच पानांवर लाटांसारखे पिवळसर, तपकिरी काळे पट्टे हे मुख्य शीरेला समान पडतात.
- * सुरवातीच्या लक्षणात सलग किंवा तुटक पट्ट्यांची ठिगळासारखी संरचना शिरांना समांतर येते. पाने पट्टेदार दिसू लागतात.
- * झाडे पूर्णत: विकसित होत नाही. पानांच्या कडा अनियमितपणे गोळा होऊन करपट ठिपके दिसू शकतात.
- * कोवळी पाने देखील आकाराने लहान असतात.
- टोमॅटो पिकामधील लक्षणे फळ पिवळे पडणे, फळ वेडेवाकडे होणे,तपकिरी लालसर चट्टे दिसणे,फळ कडक होणे,फळ न पिकणे अशी आहेत.
- * संक्रमित झाड परिपक्व होत नाहीत.
- * फळांवर नेहमी लक्षणे दिसत नसली तरी आकाराने लहान दिसतात. त्यावर पिवळ्या रेषा किंवा करपटपणा दिसतो.
- * केळी पिकामध्ये या रोगाचा प्राथमिक प्रसार कंदामार्फत तर दुय्यम प्रसार मावा किडीमार्फत होतो.
- * मुख्यतः मावा किडीच्या काही प्रजाती कुकुंबर मोझॅक व्हायरस च्या वाहक म्हणून काम करतात.त्यामध्ये प्रामुख्याने ऑफिस क्रॅसीव्होरा, ऑफिस गॉसिपी, मायझस पर्सिकी या आहेत. त्यांच्यामुळे विषाणू एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पोचतात.
- * ऑफिस गॉसिपी मावा कापूस आणि भेंडीत अधिक आढळतो.
- * या रोगाचा प्रसार होण्यासाठी पंख असलेल्या माव्याचा धोका अधिक असतो कारण एका पिकावरून दुसऱ्या पिकापर्यंत प्रसार करण्याची त्याची क्षमता असते.
- * थंड हवामानामध्ये माव्याची संख्या अधिक वेगाने वाढते.
- * सतत ढगाळ वातावरण असणे,पावसाळ्याच्या सुरवातीला आणि शेवटी वारंवार पाऊस, हवेचे कमी तापमान (24 अं.से) वाढलेली आर्द्रता यासारखी ठराविक हवामान परिस्थिती संक्रमणास अनुकूल असते.
- * रोगाचा दुय्यम प्रसार मावा किडीच्या प्रजातीमार्फत होतो.
- * टोमॅटो व मिरची पिके एकमेकांजवळ घेऊ नयेत त्यामुळे रोगाचा धोका जास्त असतो.
- * एकाच वर्षात टोमॅटो, मिरची व बटाटा हि पिके घेऊ नयेत.
- एक पीक घेतल्यानंतर दुसरे पीक लगेच घेऊ नये, असे पीक घेऊ नये त्यामध्ये किमान १-२ महिन्यांचे अंतर असावे.
- * यामध्ये पीक फेरपालट अत्यंत गरजेची आहे. त्यामध्ये आपण टोमॅटोनंतर शेंगवर्गीय (बीन्स) किंवा द्विदलवर्गीय पीक घ्यावे.
- * सिएमव्ही चे व्यवस्थापन करता येते पण त्या विषाणूला मारता येत नाही त्यामुळे रासायनिक औषधे वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे.
- * रोगप्रतिकारक वाण फक्त काकडी पिकामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे इतर पिकांमध्ये सुरुवातीपासूनच काळजी घेणे महत्वाचे आहे.
- * माव्याच्या नियंत्रणासाठी आपण एकरी ३०-४० पिवळे निळे चिकट सापळे वापरू शकतो.
- * सुरुवातीच्या टप्प्यात निम तेलाचा वापर करावा माव्याचा प्रादुर्भाव आढळल्यास व्हर्टिसीलियम लॅकिनी या मित्रबुरशीचा वापर करा.
- * आपल्या शेतामध्ये लेडी बर्ड बीटल सारखे मित्रकीट शेतामध्ये वाढ करूनही मावा नियंत्रण करू शकतो.
- * पिकामध्ये माव्याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर जातोय असे जाणवल्यास रासायनिक औषधांची फवारणी करा.
- * रासायनिक कीटकनाशक वापरताना लेबल क्लेम तपासावे.
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipm_school,#IPM,#cucurbits,#CMV,#mosaic_virus,#viral,#viraldisease
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा