वेस्ट डिकंपोजरमधील सूक्ष्म जिवाणू" | Microbes in Waste Decomposers"

 


वेस्ट डिकंपोजरमधील सूक्ष्म जिवाणू"*

वेस्ट डिकंपोजर"मध्ये चार मुख्य प्रकारचे सूक्ष्म जीवाणू आहेत. 1) Cellulose degrading Bacteria 2) Xylan degrading Bacteria 3) Phosphorus solubilizing Bacteria (PSB) 4) Potash solubilizing Bacteria (KSB) 1) *Cellulose degrading Bacteria:-* Cellulose (सेल्युलोज) म्हणजे कुठल्याही सेंद्रीय पदार्थातील मुख्य घटक. याला degrade करणारे म्हणजेच सडवणारे किंवा कुजवणारे सूक्ष्म जीवाणू. म्हणजेच लाकडा पासुन किंवा टाकावू पदार्था पासून कार्बन विलग करणारा जिवाणू. हा जिवाणू औद्योगिक वापरात खुपच मोठ्या प्रमाणात सडवन्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तेंव्हा सहाजीकच याच जिवाणूची तीव्रता या कल्चर मध्ये सर्वात जास्त आहे. त्यामुळे याचा वापर कीड नियंत्रणासाठी ही करता येते. वेस्ट डि कंपोजर मधिल याच जिवाणूच्या फवारणीने किडींची मेणयुक्त (wax) त्वचा रखरखीत करून त्यांचा उत्कृष्ट परीणाम सोबतच्या साधारण विषाणे (औषधी) मिळवणे सहज शक्य आहे. परंतु, पिकास जमीनीतूनही बरेच काही हवे असते, ज्याचा पुरवठा जमीनीतील सेंद्रीय कर्बाच्या विघटनातून होत असतो. यासाठी जमीनीतील सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण (आच्छादन किंवा टाकावू पदार्थ) जमिनीत वाढवण्यासाठी प्रयत्न करणे तितकेच महत्वाचे आहे. अशा वेगवान विघटकाचा वापर करताना जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी विशेष श्रम घेणेही तितकेच आवश्यक आहे. 2) *Xylan degrading Bacteria:-* Xylan (झायलान) म्हणजे काय? सेंद्रीय पदार्थातील पेशींच्या आतील आवरणास Xylan असे शास्त्रीय नाव आहे. या आवरणाचे विघटन करणारे सूक्ष्म जीवाणू. हे दोन्ही प्रकारचे काम करणारे सूक्ष्मजीवाणू म्हणजे Pseudomonas, Bacillus, Rhizobium हे आहेत. यांच्यामुळे नत्र स्थिरीकरणास चालना मिळते. आच्छादनातील बायाेमासचे वेगाने 'डि-कंपोज करुन पिकास मुख्य अन्नद्रव्यांच्या व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा थेट पुरवठा 'डि-कंपोजर करते. 3)*PSB (Phosphorus solubilizing Bacteria):-* दाेन अथवा तिन कणांनी बनलेल्या फॉस्फाेरसचे विघटन करुन सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये रुपांतरीत करुन मुळांना देते. 4)*KSB (Potash solubilizing Bacteria):-* मातीतील पाेट्याश सुलभतेने घेण्यास मुळांना मदत करते. अशा प्रकारे मुख्य अन्नद्रव्यांचा व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा थेट पुरवठा 'डि-कंपोजर करते. तसेच बुरशी नाशक व किटकनाशक म्हणुनही याचा वापर करु शकताे. या सर्व गुणांमुळेच वेस्ट डि-कंपोजर शेतकर्‍यांसाठी वरदान आहे. संदर्भ- NCOF-गाझियाबाद.

*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-*

🌱 सत्यजित मिरापुरे, यवतमाळ

*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

बीजप्रक्रिया । बीजप्रक्रियेचे फायदे । Benefits of Seed Treatment |

उन्हाळ्यामधील जमीन नांगरणी । फायदे । Benefits of Summer Ploughing