सूत्रकृमीची प्रादुर्भाव लक्षणे | Symptoms of nematode infestation
सूत्रकृमीची प्रादुर्भाव लक्षणे कशी असतात? नियंत्रण कसे करावे? सूत्रकृमी(निमेटोड्स) हा पिकांचे नुकसान करणारा अतिसूक्ष्म धाग्यासारखा लांबट जीव असून त्याची सरासरी लांबी ०२ ते ०.५ मि.मी. असते. तो डोळ्यांनी दिसत नाही. त्याला जगण्यासाठी प्रामुख्याने ओलावा व पिकांची जरुरी असते. जमिनीतील मातीच्या कणांच्या पोकळीत त्याचे वास्तव्य असते. तो जमिनीत अगर झाडांची मुळे जमिनीलगत खोडाच्या अंतर्गत भागात राहून नुकसान करतो. महाराष्ट्रात निरनिराळ्या पिकांवर सुमारे ७५ प्रकारच्या सुत्रकृमींचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी पिकांच्या मुळांवर गाठी करणारी(रूट नॉट),सिस्ट निमेटोड्स,रूट लेशन निमेटोड्स,रॅडोफोलस व डँगर या सूत्रकृमींच्या महत्त्वाच्या प्रजाती आहेत. *रोग लक्षणे:-* •सुत्रकृमीचा प्रादुर्भाव पिकास मुळाद्वारे होतो. •मुळांच्या तंतूमध्ये तोंड खुपसून त्यामधील अन्नद्रव्ये घ्यायला चालू करतात.त्यामुळे मुळावर गाठी तयार व्हायला चालू होतात. •पिकाची वाढ कमी होते वाढ खुंटते, अन्नद्रव्यांची कमतरता दिसु लागते. •अन्नद्रव्ये पूर्णपणे लागू होत नाहीत.पिक पोषणास अन्नद्रव्ये व पाणी मिळत नाही. •फुले ...