मक्का पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख किडी | Major pests of maize crop

 


*मक्का पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख किडी*
  • ठिपक्यांचा खोड कीडा/स्पॉटेड स्टेम बोअर (चिलो पार्टेलस)
  • गुलाबी खोड कीडा (सेसमिया इन्फेरेन्स)
  • अमेरिकन लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा)
*1.ठिपक्यांचा खोड कीडा/स्पॉटेड स्टेम बोअर (चिलो पार्टेलस)* ठिपक्यांचा खोड कीडा (चिलो पार्टेलस) ही मक्का पिकामध्ये खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाची कीड आहे, ज्यामुळे भारतातील विविध कृषी-हवामान विभागातमध्ये 26-80% इतके नुकसान होऊ शकते. मादी पतंगाने दिलेली अंडी सपाट, अंडाकृती, पिवळ्या रंगाची असतात आणि एकत्र समूहात घातली आहेत. अळी पिवळसर तपकिरी रंगाची असते. अळीचे डोके साधारण तांबड्या रंगाचे असते तसेच पाठीवर ठिपक्यांच्या चार रेषा असतात . अळी अवस्था सुमारे 14-28 दिवसात पूर्ण होते. प्रौढ मादी पतंग पांढरट असतात, नर पतंग मादी पतंगा पेक्षा आकाराने लहान असतात. जीवनचक्र सुमारे 5-6 आठवड्यांत पूर्ण होते. *2.गुलाबी खोड कीडा (सेसमिया इन्फेरेन्स)* गुलाबी खोड कीडा हा रब्बी हंगामात (हिवाळ्यात) मक्यावर येणारी कीड,ज्यामुळे उत्पादनात 25 -75% नुकसान होऊ शकते. या किडीची अंडी मलईदार पांढरी असतात, पानांच्या खालच्या भागामध्ये 2-4 ओळींमध्ये घातली जातात. या किडीच्या अळीचा रंग हलका गुलाबी ते जांभळा असू शकतो. अळी अवस्था 22 ते 36 दिवसात पूर्ण होते. पतंग-अंडी-अळी-कोशिका आणि पुन्हा पतंग अशा प्रकारे जीवनचक्र पूर्ण होते. संपूर्ण जीवनचक्र ४०-५३ दिवसांत पूर्ण होते. *3.अमेरिकन लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा)* अमेरिकन लष्करी अळी (FAW) ही एक आक्रमक कीड आहे जी पिकाच्या सर्व टप्प्यांवर मक्याचे गंभीर नुकसान करू शकते. भारतात या किडीची पहिली नोंद मे २०१८ मध्ये झाली होती. मादी पतंग आपली अंडी पानाच्या वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला घालतात आणि ते झाकून ठेवतात. प्रत्येक पुंजक्यामध्ये 50-150 अंडी असतात. अशा प्रकारे ते 3-4 वेळा अंडी घालतात. अंड्यातून अळी ४-५ दिवसांत बाहेर पडते. अळी हिरवी-तपकिरी रंगाची असते. अळीच्या लाल-तपकिरी डोक्याच्या वर, डोळ्यांच्या मधोमध, उलटा इंग्रजी "Y" चा आकार असतो. अळी अवस्था १५-१८ दिवसांत पूर्ण होते. कोष लालसर तपकिरी रंगाचा असतो. 7-9 दिवसांनंतर, प्रौढ पतंग कोषातून बाहेर पडतात. मादी पतंग पांढरा ते तपकिरी रंगाचा असतो आणि नर पतंग मादीपेक्षा लहान आणि पूर्ण तपकिरी रंगाचा असतो. संपुर्ण जीवन चक्र सुमारे 30-35 दिवसात पूर्ण होते, पर्यावरणीय परिस्थितीनुसार थोडाफार बदल होऊ शकतो. प्रौढ पतंग 4-7 दिवस जगतात. प्रौढ पतंग 500 किमी पर्यंत उडू शकतो. ते दूर वर उडू शकतात.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

बीजप्रक्रिया । बीजप्रक्रियेचे फायदे । Benefits of Seed Treatment |

उन्हाळ्यामधील जमीन नांगरणी । फायदे । Benefits of Summer Ploughing