पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भात पिकामध्ये नुकसान करणाऱ्या महत्वाच्या किडी । Pest Damage in Paddy

इमेज
                     भात हे महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भात तसेच कोकणात प्रामुख्याने घेतले जाणारे पिक आहे. खरिपामध्ये भात पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात दिसून येते.काही भागात पेरणी केली जाते, तर काही भागामध्ये रोप लावणी द्वारे भात पिक लावले जाते.    भाताचे कमी उत्पादन मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे किडीचा प्रादुर्भाव आहे. रोपांच्या अवस्थेपासून ते पिक काढणीपर्यंत वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला भात पिकामध्ये दिसून येतो. कीड नियंत्रणासाठी पिकामध्ये कोणकोणत्या किडी येतात हे माहिती असल्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी मदत होईल आणि आपला उत्पादन खर्चही कमी होईल.   भात पिकामध्ये येणाऱ्या किडी:- लष्करी अळी:- अळया लष्करा प्रमाणे हल्ला करतात. रोपांची पाने कुरतडल्यामुळे पिकाची पाने नाहीसी होतात. तसेच पीक लोंबी अवस्थेत असताना या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास धानाच्या लोंब्या कुरडल्यामुळे शेतात लोंब्याचा सडा पडलेला आढळतो. अळया रात्री कार्यक्षम असून दिवसा धानावर, बेचक्यात व बांधावरील गवतात लपून बसतात. गादम...

कापूस पिकांमधील रसशोषक किडी । किडींमुळे होणारे नुकसान । Cotton Pest |

इमेज
  कापूस खरिपामधील एक महत्वाचे पीक आहे. या दिवसांमध्ये एकसारखा पाऊस, कमी तापमान आणि जास्त आर्द्रता यामुळे पिकावर किडीचे आणि रोगांचे प्रमाण देखील जास्त प्रमाणात राहते. कापूस पिकाचा विचार करताना या पिकामध्ये खूप किडींचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होते.    पिकाचे प्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या किडींसोबत रस शोषक किडीही पिकाचे नुकसान बऱ्याच मोठ्या प्रमाणात करू शकतात. रस शोषक किडीमध्ये पांढरी माशी, मावा, तुडतुडे, थ्रिप्स, स्टिंग बग तसेच इतर अनेक किडी पिकाचे नुकसान करतात. ज्यामुळे उत्पादनांवर देखील परिणाम होतो. तर आज आपण कापूस पिकामध्ये कोणत्या महत्वाच्या रस शोषक किडींमुळे नुकसान होते याबद्दल माहिती घेऊया.  *कापूस पिकाला नुकसान करणाऱ्या प्रमुख रसशोषक किडी तुडतुडे:- तुडतुडे हे कापूस पिकाचे एक महत्त्वाची रसशोषक कीड आहे. हे लहान, फिकट हिरव्या रंगाचे कीटक झाडाच्या पानांमधून रस शोषून पिकाचे मोठे नुकसान करतात. नुकसान: * पाने पिवळी आणि लालसर होणे: तुडतुड्यांची पिल्ले आणि प्रौढ कीटक पानांच्या खालच्या बाजूला राहून रस शोषतात. यामुळे पानांच्या कडा प्रथम पिवळ्या पडतात आणि नंतर लालसर किंवा तपकिर...

भात पिकांमधील उत्पादन वाढीचे तंत्र । युरिया ब्रिकेटचा वापर । Paddy Farming

इमेज
  महाराष्ट्रामध्ये भाताचे पीक काही भागात जास्त प्रमाणात होते तर काही कमी प्रमाणात घेतले जाते. प्रामुख्याने कोकण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भात पिकवले जाते. चांगले उत्पन्न मिळण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे.    पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना वेगवेगळे रासायनिक खते किंवा युरियाचा वापर कारण्याऐवजी जर युरिया ब्रिकेटचा वापर केला तर खताचा अपव्यय टाळून उत्पादन वाढीसाठी नक्कीच फायदा मिळणार आहे. तर आज आपण हे युरिया ब्रिकेट काय आहे आणि त्याचा वापर कसा करता येईल याची संपूर्ण माहिती घेऊया.  युरिया ब्रिकेट   युरिया ब्रिकेट म्हणजे युरिया खताची दाबून तयार केलेली गोळी. ही गोळी साधारणपणे २.७ ते ३ ग्रॅम वजनाची असते आणि ती हळूहळू जमिनीत विरघळते. यामुळे युरियाची कार्यक्षमता वाढते आणि झाडांना दीर्घकाळ नत्राचा पुरवठा होतो. वापर कधी करावा?  * भात रोप लागणी झाल्यानंतर ७ ते १० दिवसांनी युरिया ब्रिकेटचा वापर करणे सर्वात योग्य मानले जाते. या वेळेस झाडांना नत्राची सर्वाधिक गरज असते आणि ब्रिकेटमुळे त्यांना वेळेवर आणि योग्य प्रमाणात नत्र मिळते. * जर भात रोपांच...