भात पिकांमधील उत्पादन वाढीचे तंत्र । युरिया ब्रिकेटचा वापर । Paddy Farming
महाराष्ट्रामध्ये भाताचे पीक काही भागात जास्त प्रमाणात होते तर काही कमी प्रमाणात घेतले जाते. प्रामुख्याने कोकण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भात पिकवले जाते. चांगले उत्पन्न मिळण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे.
पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना वेगवेगळे रासायनिक खते किंवा युरियाचा वापर कारण्याऐवजी जर युरिया ब्रिकेटचा वापर केला तर खताचा अपव्यय टाळून उत्पादन वाढीसाठी नक्कीच फायदा मिळणार आहे. तर आज आपण हे युरिया ब्रिकेट काय आहे आणि त्याचा वापर कसा करता येईल याची संपूर्ण माहिती घेऊया.
युरिया ब्रिकेट
युरिया ब्रिकेट म्हणजे युरिया खताची दाबून तयार केलेली गोळी. ही गोळी साधारणपणे २.७ ते ३ ग्रॅम वजनाची असते आणि ती हळूहळू जमिनीत विरघळते. यामुळे युरियाची कार्यक्षमता वाढते आणि झाडांना दीर्घकाळ नत्राचा पुरवठा होतो.
वापर कधी करावा?
* भात रोप लागणी झाल्यानंतर ७ ते १० दिवसांनी युरिया ब्रिकेटचा वापर करणे सर्वात योग्य मानले जाते. या वेळेस झाडांना नत्राची सर्वाधिक गरज असते आणि ब्रिकेटमुळे त्यांना वेळेवर आणि योग्य प्रमाणात नत्र मिळते.
* जर भात रोपांची पुनर्लागवड केली असेल, तर त्या लागवडीनंतर ७ ते १० दिवसांनी याचा वापर करावा.
* युरिया ब्रिकेटचा वापर करताना जमीन पूर्णपणे दलदलीची किंवा ओलावा असलेली असावी. त्यामुळे ब्रिकेट्स जमिनीत व्यवस्थित बसतात आणि हळूहळू विरघळतात.
वापरण्याची पद्धत:
* भात रोप लागणीनंतर ७-१० दिवसांनी, जेव्हा शेतात पाणी असेल, तेव्हा ब्रिकेट वापरा.
* दोन रोपांच्या मध्यभागी, चार रोपांच्या मधोमध एक ब्रिकेट जमिनीत ३-४ इंच खोलवर दाबा.
* ब्रिकेट दाबताना ती जमिनीत पूर्णपणे झाकली जाईल याची खात्री करा. ती जमिनीच्या पृष्ठभागावर राहिल्यास तिचा फायदा कमी होतो.
* हे काम करताना शेतात पाणी ३-५ सेंमी. असावे. ब्रिकेटचा वापर करताना पाणी असल्यास ती जमिनीत लवकर विरघळते.
युरिया ब्रिकेट वापरण्याचे फायदे:
* युरिया ब्रिकेट हळूहळू विरघळत असल्यामुळे नत्र (नायट्रोजन) वाया जात नाही आणि झाडांना दीर्घकाळ उपलब्ध राहते.
* सामान्य युरियाच्या तुलनेत युरिया ब्रिकेटचा वापर कमी प्रमाणात लागतो, त्यामुळे खतावरील खर्च वाचतो.
* नत्राचा योग्य पुरवठा झाल्यामुळे भाताचे उत्पादन ३०-४० टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
* युरिया ब्रिकेट थेट मुळांच्या जवळ टाकल्यामुळे तणांना नत्र मिळत नाही, त्यामुळे तणांची वाढ कमी होते.
* नत्र वायूच्या स्वरूपात हवेत मिसळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण कमी होते.
कोणत्याही पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी पिकाला लागणाऱ्या पोषक तत्वांचा वापर प्रभावी करणे आवश्यक आहे. तरच उत्पादन खर्च कमी होईल आणि उप्तादनही वाढेल.
स्रोत-इंटरनेट
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
क्रुषिभूषण सयाजीराव गोपाळराव पोखरकर कोतूल ता.अकोले जि.अहिल्यानगर
महेंद्र आत्माराम जगताप, विटा खानापूर सांगली
शिवाजी चौगले, राधानगरी कोल्हापूर
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipm #IPM #gogreen #paddy #paddyfarming #uriabriquettes #smartfarming
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा