पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बिन्सची शेती । पिकाचे नुकसान करणाऱ्या किडी । Bean Farming

इमेज
   बिन्स हे लवकर येणाऱ्या पिकांपैकी असून बाजारामध्ये चांगली मागणी सुद्धा आहे. बीन्स पिकामध्ये प्रामुख्याने फ्रेंच बीन्स, श्रावण घेवडा, वाल यांचा समावेश होतो. या पिकांची लागवड करून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात.   पिकामध्ये येणारी कीड आणि रोगांमुळे पिकाचे मोठे नुकसान होऊन उत्पन्नामध्ये घट होऊ शकते. बिन्स (फ्रेंच बीन्स) पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात ३०% ते ८०% पर्यंत घट होऊ शकते. तर आज आपण बीन्स पिकामध्ये कोणत्या किडीमुळे नुकसान होऊ शकते याबद्दल माहिती घेऊया.  बिन्स मधील नुकसान कारक किडी:- १. खोड माशी (Bean Fly):- ही कीड सुरुवातीच्या अवस्थेत (रोपावस्थेत) सर्वाधिक नुकसान करते. नुकसान:- माशी कोवळ्या पानांवर अंडी घालते. त्यातून बाहेर पडणारी अळी पानाच्या शिरेतून प्रवास करत थेट खोडात शिरते. परिणाम: अळी खोडाचा आतील भाग (गाभा) खाते, ज्यामुळे अन्नपुरवठा खंडित होतो. रोप पिवळे पडते, सुकते आणि शेवटी मरते. रोप उपटून पाहिले असता खोड मधून फाटलेले दिसते. २. रसशोषक किडी:- यामध्ये प्रामुख्याने मावा, तुडतुडे, फुलकिडे (Thrips) आणि पांढरी माशी यांचा समावेश होतो. नुक...

ऊसाचे पाचट । शेतामध्येच कुजवल्यास मिळणारे फायदे । Sugarcane Farming

इमेज
  ऊसाचे पाचट जाळणे ही जरी वेळ वाचवणारी पद्धत वाटत असली, तरी ती शेतीसाठी 'स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखी' आहे. पाचट जाळल्यामुळे होणारे नुकसान केवळ जमिनीपुरते मर्यादित नसून त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. पण हेच पाचट आपण जाळण्या ऐवजी शेतामध्ये कुजवल्यास भरपूर असे फायदे मिळू शकतात.  पाचट जाळल्यामुळे होणारे तोटे:- १.जमिनीतील मित्रजीवांचा नाश: - जमिनीचा सुपीकपणा टिकवून ठेवणारे उपयुक्त जीवाणू आणि बुरशी आगीच्या उष्णतेमुळे नष्ट होतात. *जमिनीला जिवंत ठेवणारे गांडूळ उष्णतेमुळे मरतात किंवा जमिनीच्या खूप खोलवर जातात, ज्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. २.अन्नद्रव्यांचा ऱ्हास:- पाचट जाळल्यामुळे त्यातील नत्र (Nitrogen) पूर्णपणे हवेत उडून जातो. * इतर घटक: स्फुरद आणि पालाश यांसारखी अन्नद्रव्ये राखेच्या स्वरूपात उरतात खरी, पण ती वाऱ्याने उडून जातात किंवा पाण्यासोबत वाहून जातात. एक टन पाचट जाळल्यामुळे जमिनीचे सुमारे ५ ते ६ किलो नत्र, १ ते २ किलो स्फुरद आणि ८ ते १० किलो पालाश यांचे नुकसान होते. ३.सेंद्रिय कर्बाचे नुकसान:- सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा कणा आहे. पाचट जाळल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्...