बिन्सची शेती । पिकाचे नुकसान करणाऱ्या किडी । Bean Farming

 


 बिन्स हे लवकर येणाऱ्या पिकांपैकी असून बाजारामध्ये चांगली मागणी सुद्धा आहे. बीन्स पिकामध्ये प्रामुख्याने फ्रेंच बीन्स, श्रावण घेवडा, वाल यांचा समावेश होतो. या पिकांची लागवड करून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. 

 पिकामध्ये येणारी कीड आणि रोगांमुळे पिकाचे मोठे नुकसान होऊन उत्पन्नामध्ये घट होऊ शकते. बिन्स (फ्रेंच बीन्स) पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात ३०% ते ८०% पर्यंत घट होऊ शकते. तर आज आपण बीन्स पिकामध्ये कोणत्या किडीमुळे नुकसान होऊ शकते याबद्दल माहिती घेऊया. 

बिन्स मधील नुकसान कारक किडी:-

१. खोड माशी (Bean Fly):-

ही कीड सुरुवातीच्या अवस्थेत (रोपावस्थेत) सर्वाधिक नुकसान करते.

नुकसान:- माशी कोवळ्या पानांवर अंडी घालते. त्यातून बाहेर पडणारी अळी पानाच्या शिरेतून प्रवास करत थेट खोडात शिरते.

परिणाम: अळी खोडाचा आतील भाग (गाभा) खाते, ज्यामुळे अन्नपुरवठा खंडित होतो. रोप पिवळे पडते, सुकते आणि शेवटी मरते. रोप उपटून पाहिले असता खोड मधून फाटलेले दिसते.

२. रसशोषक किडी:-

यामध्ये प्रामुख्याने मावा, तुडतुडे, फुलकिडे (Thrips) आणि पांढरी माशी यांचा समावेश होतो.

नुकसान:- हे कीटक समूहाने पानांच्या खालच्या बाजूला राहून पानांतील रस शोषतात.

परिणाम:- पाने वेडीवाकडी होतात किंवा वरच्या बाजूला वळतात (बोकड्या रोग) पानांवर चकाकी येते किंवा ती पिवळी पडतात.

विषाणूजन्य रोगांचा प्रसार: पांढरी माशी आणि मावा हे 'पिवळा मोझॅक' सारख्या रोगांचे वहन करतात, ज्यामुळे संपूर्ण शेत पिवळे पडून नष्ट होऊ शकते.

३. शेंग पोखरणारी अळी (Pod Borer):-

ही कीड थेट तुमच्या उत्पन्नावर (शेंगांवर) हल्ला करते.

नुकसान:- अळी सुरुवातीला कळ्या आणि फुले खाते. त्यानंतर ती शेंगेला छिद्र पाडून अर्धी आत आणि अर्धी बाहेर अशा अवस्थेत राहून दाणे खाते.

परिणाम: शेंगांना छिद्र पडल्यामुळे त्या बाजारात विकण्यायोग्य राहत नाहीत आणि प्रत खराब होते.

४. पाने खाणारी अळी (Tobacco Caterpillar):-

नुकसान:- या अळ्या रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतात. त्या कोवळी पाने आणि शेंगा खरवडून खातात.

परिणाम: मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास झाडाचा फक्त सांगाडा उरतो (पानांच्या फक्त शिरा शिल्लक राहतात).

५. नागअळी (Leaf Miner):-

नुकसान करण्याची पद्धत: ही अळी पानाच्या दोन थरांच्या मध्ये शिरून हिरवा भाग (हरितद्रव्य) खात पुढे जाते.

परिणाम: पानांवर पांढऱ्या नागमोडी रेषा दिसतात. यामुळे झाडाची अन्न तयार करण्याची क्षमता कमी होते आणि वाढ खुंटते.

*नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स:-

*पिवळे आणि निळे चिकट सापळे: मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी शेतात एकरी ३०-४० सापळे लावावेत.

*निंबोळी अर्काची फवारणी: सुरुवातीच्या काळात ५% निंबोळी अर्काची फवारणी केल्यास किडींचा प्रादुर्भाव रोखता येतो.

*खोड माशी नियंत्रणासाठी थायोमेथोक्साम बीजप्रक्रिया किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीनची फवारणी करू शकता.

*रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क (५%) किंवा इमिडाक्लोप्रीड (०.५ मिली) फवारणी करू शकता.

*शेंग पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस (२ मिली) किंवा स्पिनोसॅड (०.३ मिली) फवारणी करावी. 

जर वेळीच प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपायांचा अवलंब केल्यास कीड नियंत्रण होऊन चांगले उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकते. 

स्रोत - इंटरनेट


उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-

शरद बोन्डे , अचलपूर अमरावती

दत्तात्रय बुजवाडे, कोल्हापूर 

निशिकांत शा. मडावी मु. पो. ता लाखनी , जी.भंडारा

उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद

*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in

 *Join Us On Social Media Also👇* 

*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS

 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1

*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR

*Linkedin:-

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/


#ipmschool #IPM #gogreen #beans #farming #pest #beansfarming #agriculture #smartfarming 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नारळामधील सर्वांत धोकादायक कीड । सोंड्या भुंगा । नुकसान आणि नियंत्रण उपाय । Red Palm Weevil

आंबा फळगळ समस्या । कारणे आणि उपाय । Mango Fruit Dropping Problem & Solutions

भाजीपाला पिकातील रोग व्यवस्थापन । मर रोग कारण आणि नियंत्रण । Vegetables wilt disease