झुकिनी पीक व्यवस्थापन । Zucchini ।
🏫IPM SCHOOL🌱 झुकिनी हे समर स्क्वॅश आणि विंटर स्क्वॅश या नावाने ओळखले जाते. त्याची शास्त्रीय नावे अनुक्रमे कुकुरबिटा मॅझिमा आणि कुकुरबिटा पेपो अशी आहेत. दोन्ही प्रकारातील झाडे बुटकी , झुडूप वजा असतात. झुकिनीच्या झुडूपवजा झाडांवर नर आणि मादी अशी दोन्ही प्रकारची फुले असतात. नर फुलांचा आकार मादी फुलांच्या आकारापेक्षा लहान असून , दोन्ही फुलांचा रंग पिवळा असतो. इतर देशांमध्ये या फुलांचा उपयोग खाण्यासाठी किंवा पदार्थ सजविण्यासाठी करतात. काकडी आणि दुधी भोपळ्याची मिश्रित चव व काकडीसारखेच आकाराने दिसणारे या पिकाचे फळ गर्द हिरवे , पोपटी , राखाडी व पिवळ्या रंगात येते. लागवड: - · झुकिनी पिकाचा कालावधी फारच कमी असतो. तो जातीपरत्वे हंगामाप्रमाणे बदलतो. सर्वसाधारण कालावधी थंड हवामानात १० ते १५ दिवसांनी लांबतो. लागवड वर्षभर करता येत असली , तरी पावसाळ्यातील (जून-जुलै) लागवड उत्पादनाच्या दृष्टीने किफायतशीर ठरते. · हिवाळ्यात लागवड केल्यास वाढीचा कालावधी लांबल्यामुळे उत्पादन नेहमीपेक्षा १०-१५ दिवसांनी पुढे जाते. उन्हाळ्यातील लागवड ह...