पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तंबाखु रोपावस्थेतील कुज | Tobacco plant rot

इमेज
* तंबाखु रोपावस्थेतील कुज* उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागासह आंध्रप्रदेश,आसाम,बिहार,छत्तीसगड,गुजरात,मध्यप्रदेश,ओडिशा,तामिळनाडू,तेलंगना,उत्तरप्रदेश,पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तंबाखू पीक घेतले जाते. तंबाखू लागवडी आधी रोपे तयार करून घ्यावी लागतात. याच रोप तयार करताना रोप 'लागणे' म्हणजेच रोप कुजण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणात भेडसावते. *ही समस्या मुख्यतः बुरशीजन्य रोगामुळे उदभवते.* *कारक बुरशी: -* Pythium spp,Olpidium brassicae,Thielaviopsis basicola या बुरशींमुळे रोप कुज होऊ शकते. *प्रादुर्भाव लक्षणे:-* •बियाणे बेड वर टाकल्यानंतर 3-4 दिवसांनी पूर्णपणे उगवून आलेले दिसून येतात. कारक बुरशी ह्या माती जनीत असल्याने त्यांचा प्रादुर्भाव हा मुळाकडून देठाकडे दिसून येतो. •काही ठिकाणी पाने तपकिरी पिवळे पडलेली दिसतात. ज्या ज्या ठिकाणी जास्त दाट बी पडलेले आहे त्या ठिकाणी पाने कुजायला चालू होतात. •रोप उपसल्यास मुळे पूर्णपणे तपकिरी पडली असल्यास Olpidium brassicae या कारक बुरशीचा प्रादुर्भाव समजावा.ज्या ठिकाणी बेड वर पाणी जास्त वेळ साचते तिथे जास्त प्रादुर्भाव पहायला मिळतो

कापसामध्ये बोंड खराब करणाऱ्या अळी | Bollworms in cotton

इमेज
कापूस पिकामध्ये अनेक किटांमुळे पिकाचे नुकसान होते. काही किडी पिकातील पानांचे, काही खोडाचे आणि काही कापसाचे बोंडे खराब करतात. कापसाच्या बोंडावर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस पिकातील बोंडाचे नुकसान करणाऱ्या किडीची माहिती शेतकऱ्याला हवी असल्यास. तरच शेतकरी किडीचे उत्तम व्यवस्थापन करून पिकाचे नुकसान टाळू शकतात. तर आज जाणून घेऊया कोणत्या किडीमुळे कापसाच्या बोंडाचे नुकसान होऊ शकते. कापूस/अमेरिकन बोंडअळी (Helicoverpa armigera):- कापसातील हिरवी सुरवंट, हरभरा सुरवंट आणि सोयाबीनमधील शेंगा सुरवंट हे सर्व सारखेच आहेत. सुरवंट पूर्णपणे हिरवा असतो, काहीवेळा हवामानामुळे तो हिरवा ते तपकिरी रंगाचा दिसतो. सुरवंट कापसाच्या शेंगा खातो आणि फळाच्या आत जातो. सुरवंटाचे तोंड आतून दिसते आणि बाकीचे शरीर बाहेर दिसते. सुरवंटाची विष्ठा बॉल/पॉडवर दिसू शकते आणि सुरवंट सरासरी 30 ते 40 शेंगा खराब करते. गुलाबी बोंडअळी/पेक्टिनोफोरा गॉसिपिएला:- कापूस सुरवंटांमध्ये सर्वात धोकादायक सुरवंट गुलाबी सुरवंट आहे. त्यासाठी बीटी कॉटनमध्ये बदल करण्यात आला. हा सुरवंट चमकदार गुलाबी रंगाचा दिसतो, म्हणून

सोयाबीनवरील तांबेरा रोग । सोयाबीन रोग व्यवस्थापन । Soyabean Disease

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱     सोयाबीन पिकामध्ये फुलोरा अवस्था पूर्ण होताच एक महत्त्वाचा रोग येतो म्हणजेच तांबेरा/सोयाबीन रस्ट होय.   कारक बुरशी : Phakopsora pachyrhizi  प्रादुर्भाव लक्षणे:-    •जसे सोयाबीन फुलोरा अवस्था पार करते तसे या रोगाची लक्षणे दिसायला सुरवात होतात.  •सुरवातीस जमिनीलगतच्या पानांच्या खालील बाजूस लक्षणे दिसायला चालू होतात. नंतर वरील पानावर चॉकलेटी-राखाडी/लाल-तपकिरी रंगाचे अनेक ठिपके दिसायला लागतात.  •या तांबेरा रोगाची लक्षणे इतर रोग जसे जिवाणूजन्य ठिपके(Bacterial blight), केवडा(डाऊनी मिल्ड्यू),सरकोस्पोरा ब्लाईट या रोगांशी थोडी मिळती जुळती असतात त्यामुळे ओळखण्यास अडचण येऊ शकते.  •या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे कोनाच्या आकाराचे ठिपके, त्यानंतर हे ठिपके मोठे होत जातात.  •ठिपक्या बाहेरील भाग पिवळा पडतो.लांबून पाहिल्यास रोगग्रस्त भाग पिवळा पडत असल्यासारखा दिसतो.  •या ठिपक्यांमध्ये तांबूस रंगाची पावडर तयार होते. स्पर्श केल्यास हाताला चिकटते. ही पावडर म्हणजेच या बुरशीचे बीजाणू होय.  •प्रादुर्भाव प्रमाणाबाहेर असल्यास शेंगा व खोडावर सुद्धा प्रादुर्भाव दिसून येतोच.  •त्यानंतर खराब शेंगा