तंबाखु रोपावस्थेतील कुज | Tobacco plant rot




*तंबाखु रोपावस्थेतील कुज* उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागासह आंध्रप्रदेश,आसाम,बिहार,छत्तीसगड,गुजरात,मध्यप्रदेश,ओडिशा,तामिळनाडू,तेलंगना,उत्तरप्रदेश,पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तंबाखू पीक घेतले जाते. तंबाखू लागवडी आधी रोपे तयार करून घ्यावी लागतात. याच रोप तयार करताना रोप 'लागणे' म्हणजेच रोप कुजण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणात भेडसावते. *ही समस्या मुख्यतः बुरशीजन्य रोगामुळे उदभवते.* *कारक बुरशी:-* Pythium spp,Olpidium brassicae,Thielaviopsis basicola या बुरशींमुळे रोप कुज होऊ शकते. *प्रादुर्भाव लक्षणे:-* •बियाणे बेड वर टाकल्यानंतर 3-4 दिवसांनी पूर्णपणे उगवून आलेले दिसून येतात. कारक बुरशी ह्या माती जनीत असल्याने त्यांचा प्रादुर्भाव हा मुळाकडून देठाकडे दिसून येतो.
•काही ठिकाणी पाने तपकिरी पिवळे पडलेली दिसतात. ज्या ज्या ठिकाणी जास्त दाट बी पडलेले आहे त्या ठिकाणी पाने कुजायला चालू होतात. •रोप उपसल्यास मुळे पूर्णपणे तपकिरी पडली असल्यास Olpidium brassicae या कारक बुरशीचा प्रादुर्भाव समजावा.ज्या ठिकाणी बेड वर पाणी जास्त वेळ साचते तिथे जास्त प्रादुर्भाव पहायला मिळतो. •पाने मऊ,ओलसर,तपकिरी होऊन कुजत असतील तर Pythium spp या बुरशीचा प्रादुर्भाव असतो. *प्रतिबंधक व नियंत्रण उपाय:-* •उन्हाळ्यामध्ये जमिनीची नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी. मातीचे तापमान वाढून बुरशी नष्ट होईल. •बेडची उंची किमान 15 cm इतकी असावी. पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन्ही बाजूने गटारी असाव्या •बियाणे बेड वर टाकण्याआधी खतामधील केर-कचरा,मागील पिकाचे अवशेष,गवताची मुळे वेचुन नष्ट करावीत. •बेडवर रोपांची गर्दी टाळण्यासाठी 3.5 किलो बियाणे/प्रति हेक्टरी या प्रमाणात पसरावे. •बेडवर ओलसरपणा नियमित असावा. अति प्रमाणात पाणी देणे टाळावे. नियमित व योग्य प्रमानात पाणी द्यावे. • बेडवर खते टाकताना त्यामध्ये स्पर्षजन्य बुरशीनाशके मिसळावीत.उदा.साफ(कार्बेन्डाझिम12%+मॅन्कोझेब 63%WP) *प्रमाणित बुरशी नाशके:-*
  1. बोर्डेक्स मिक्स@0.4%(Copper sulphate 40 gm+lime/चुना 40gm+10lit.water)
  2. कॉपर ऑक्सिक्लोराईड 50%WP 20 gm/10 lit
  3. वरीलपैकी कोणतेही फवारणी नॉर्मल वातावरण असताना दर चार दिवसांनी घ्यावी. दमट आणि ढगाळ वातावरणात दर दोन दिवसांनी फवारणी घ्यावी.
  4. Ridomil MZ 72 WP(मेटलेक्सिल 4% + मॅन्कोझेब 64%) 20gm /10 lit ही फवारणी उगवणी नंतर 20-30 दिवसानंतर घ्यावी.पण 2 वेळे पेक्ष्या जास्त किंवा प्रमाणा पेक्षा औषध वापरू नये.
  5. फेनामोडन 10%+ मॅन्कोझेब 50% 30gm/10 lit
  6. उगवणी नंतर 20-30 दिवसानंतर घ्यावी.
माहिती संकलन:- IPM SCHOOL *उत्तर उत्पादन शेतकरी मित्र:-* 🌱 तांडले पुंडलिक कालियास, देवांगर 🌱 प्रदिप जाधव, पन्हाळा 🌱शिवाजी चिउगळे, राधानगर, कोल्हापूर *🙏उत्तराबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏*

*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in


 *Join Us On Social Media Also👇* 


*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS


 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1


*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR


*Linkedin:-* 

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/


#ipm_school #IPM #gogreen #Tobacco #Tobaccofarming #Tobaccoplants #disease #wilting #management #diseasemanagement #farming

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean