सीताफळ पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव | Pest infestation in Sitafruit crop
सीताफळ पिकामध्ये कोणकोणती कीड येते?
*पिठ्या ढेकूण(मिलीबग):-* * किडींचा प्रादुर्भाव पावसाळयात जास्त होते. * या किडी पाने , कोवळ्या फांद्या , कळ्या आणि कोवळी फळे यांचे शोषण करतात आणि त्यांच्यातील रस पिऊन घेतात त्यामुळे फळे आणि कळ्या गळ्याला लागतात. * झाडाची पाने काळी पडतात. * या किडी मधासारखा चिकट पदार्थ सोडतात. नियंत्रण – * ही कीड लागल्यास लागलीच कीडग्रस्त फांद्या , पाने काढून टाकावेत. * त्यांवर १०% कार्बारील भुकटी टाकून गाडावीत. * १५ दिवसांच्या अंतराने ३-४ वेळा मिलीबगला खाणारे परभक्षी किटक क्रिटोलिमस मोन्टोझरी प्रती एकरी ६०० ग्रॅम बागेतील झाडावर सोडावेत. * क्लोरोपायरीफॉस २५ मिली.+ २५ ग्रॅम ऑइलरोझीन सोप प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पाण्यात मिसळून फवारणी केल्यास देखील या किडीवर नियंत्रण आणता येते. *फळ पोखरणारी पतंग कीड(फ्रुट बोरर):-* * ही कीड फळामध्ये घुसून वेडावाकडा मार्ग तयार करते. * फळामधील गर या किडी खाऊन टाकतात. * या किडीमुळे फळे गळून पडतात. * किडींची विष्टा फळावर जमा होते. नियंत्रण – * किड लागलेली फळे वेचून नष्ट करावीत. * झाडाजवळ खणून माती हलवून घ्यावी. * ४० ग्रॅम कार्बारील १० लिटर पाण्यात मिसळून ते फवारावे. *फळमाशी:-* * ही कीड फळाला बारीक छिद्र करून आतमध्ये अंडी घालते. * फळमाशीमुळे फळे खराब होतात. * फळे मोठ्या प्रमाणात गळायला लागतात. नियंत्रण – * किडलेली फळे वेचून घेऊन जमिनीमध्ये खड्डा खणून त्यात ही फळे टाकून त्यांचा नाश करावा. * फळमाशी नियंत्रणासाठी किमान एकरी १० कामगंध सापळे वापरावे. *मऊ देवी कीड ( सॉफ्ट स्केल इन्सेक्ट):-* * हि कीड दोन प्रकारची असून ती मोठ्या प्रमाणावर पानांची नासाडी करतात. * कीड पानांच्या खालच्या बाजूस अंडी घालतात. नियंत्रण – * या किडीच्या निवारणासाठी पिकांवर मेलॉथिऑन ची फवारणी करावी. * १५ ते २० दिवसांच्या अंतराने ३ ते ५ वेळा ही फवारणी करावी. *मुळांवर गाठी करणारी सूत्रकृमी:-* * सूत्रकृमी तोंडात असणाऱ्या सुई सारख्या सूक्ष्म अवयवाच्या साह्याने संपूर्ण रस शोषून घेते. * आकाराने लांबट दोऱ्यासारख्या असतात. * या झाडातील अन्नरस शोषून घेतात. * यांच्यामुळे मुळांवर गाठी निर्माण होतात आणि झाडाची वाढ खुंटते. * पाने पिवळी पडतात आणि कालांतराने गळून पडतात. * यांच्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. नियंत्रण – * फोरेट १० जी २०० ग्रॅम जमिनीत खोलपर्यंत मिसळावे. * झेंडूच्या मुळांमध्ये सूत्रकृमी नाशक गुणधर्म असतात.त्यामुळे बागेत झेंडूच्या फुलांची लागवड करावी. * प्रत्येक झाडाला २ ते ३ किलो निंबोळी द्यावे. स्त्रोत-इंटरनेट*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-*
🌱भागीनाथ असणे, अहमदनगर
🌱 प्रकाश कडागावे, निपाणी
🌱प्रदीप जाधव, पन्हाळा.
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#sitafal #foodie #food #foodphotography #coconut #panpasand #cookiencream #foodies #bhfyp #apsaraicecreams #cantgetoverit #belgianbites #falooda #dessert #seasons #foodporn #ferrerorocher #strawberry #thandai #icecream #kulfi #instagram #desserts #foodblogger #faloodalove #india #sandwich #mintmarvel #foodlover #roastedalmonde
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा