फुलकोबी/फ्लॉवर्समधील नुकसान करणाऱ्या किडी । Pest of Cauliflowers
भाजीपाला उत्पादक शेतकरी हंगामानुसार वेगवेगळी पिके घेतात ज्यामुळे शेतकऱ्याला बाजारामध्ये भावही चांगला मिळतो. बरेच शेतकरी फुलकोबी/फ्लॉवर्स हे भाजीपाला पीकही घेतात ज्यामुळे त्यांना चांगला नफाही मिळतो. पण कोणताही भाजीपाला पिकवताना पिकामध्ये कोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो हे समजणे हि खूप महत्वाचे आहे. कारण शेतकऱ्याला हे माहिती असल्यास प्रतिबंधात्मक उपायांचा वापर करून तसेच योग्य वेळी उपायांचा वापर करून पिकामध्ये नुकसान होण्यापासून वाचले जाऊ शकते. आज आपण फुलकोबी/फ्लॉवर्स पिकामध्ये कोणत्या किडीमुळे नुकसान होते हे जाणून घेणार आहोत. फुलकोबी/फ्लॉवर्स पिकामध्ये नुकसान करणाऱ्या किडी:- फ्लॉवर पिकाचे नुकसान करणाऱ्या अनेक किडी आहेत. ज्यामुळे पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होतो. मावा:- ही एक लहान, मऊ शरीराची कीड आहे, जी पानांच्या खालच्या बाजूला आणि खोडांवर आढळते. मावा पानांमधील रस शोषून घेतात, ज्यामुळे पाने पिवळी पडतात आणि त्यांची वाढ खुंटते. तसेच, ही कीड 'हनीड्यू' नावाचा चिकट पदार्थ तयार करते, ज्यामुळे बुरशीजन्य रोग वाढतात. फुलकोबी लूपर:-: या किडीला कोबीवरील...