फुलकोबी/फ्लॉवर्समधील नुकसान करणाऱ्या किडी । Pest of Cauliflowers
भाजीपाला उत्पादक शेतकरी हंगामानुसार वेगवेगळी पिके घेतात ज्यामुळे शेतकऱ्याला बाजारामध्ये भावही चांगला मिळतो. बरेच शेतकरी फुलकोबी/फ्लॉवर्स हे भाजीपाला पीकही घेतात ज्यामुळे त्यांना चांगला नफाही मिळतो. पण कोणताही भाजीपाला पिकवताना पिकामध्ये कोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो हे समजणे हि खूप महत्वाचे आहे. कारण शेतकऱ्याला हे माहिती असल्यास प्रतिबंधात्मक उपायांचा वापर करून तसेच योग्य वेळी उपायांचा वापर करून पिकामध्ये नुकसान होण्यापासून वाचले जाऊ शकते.
आज आपण फुलकोबी/फ्लॉवर्स पिकामध्ये कोणत्या किडीमुळे नुकसान होते हे जाणून घेणार आहोत.
फुलकोबी/फ्लॉवर्स पिकामध्ये नुकसान करणाऱ्या किडी:-
फ्लॉवर पिकाचे नुकसान करणाऱ्या अनेक किडी आहेत. ज्यामुळे पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होतो.
मावा:-
ही एक लहान, मऊ शरीराची कीड आहे, जी पानांच्या खालच्या बाजूला आणि खोडांवर आढळते. मावा पानांमधील रस शोषून घेतात, ज्यामुळे पाने पिवळी पडतात आणि त्यांची वाढ खुंटते. तसेच, ही कीड 'हनीड्यू' नावाचा चिकट पदार्थ तयार करते, ज्यामुळे बुरशीजन्य रोग वाढतात.
फुलकोबी लूपर:-:
या किडीला कोबीवरील लूपर म्हटले जाते. हा एक हिरवा सुरवंट आहे जो वेगाने हालचाल करतो. किडीच्या अळ्या पानांवर अनियमित छिद्रे पाडतात आणि पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. ही कीड विशेषतः रोपांच्या सुरुवातीच्या अवस्थेत अधिक नुकसान करतात.
डायमंड बॅक मॉथ:-
कोबीवर्गीय पिकांमधील हि एक महत्वाची कीड आहे जी पिकाचे सर्वाधिक नुकसान करते.या किडीच्या अळ्या लहान हिरवट रंगाच्या असून पानांच्या वरच्या थराला खातात, ज्यामुळे पाने पारदर्शक दिसतात. या किडीमुळे पानांवर छोटे छिद्र दिसतात आणि पिकाच्या वाढीवर गंभीर परिणाम होतो.
थ्रिप्स:-
हे अत्यंत लहान आणि पंख असलेले कीटक आहेत. ते पानांमधील रस शोषून घेतात, ज्यामुळे पानांवर पांढरे किंवा चंदेरी रंगाचे डाग दिसतात. या किडीमुळे पाने वाकडी होतात आणि त्यांची वाढ थांबते.
पाने खाणारे अळी:-
या किडीची अळी ही हिरव्या रंगाची अळी असून ती पाने खाताना दिसून येते. त्यामुळे पानांवर मोठी छिद्रे पडतात आणि या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास त्या काहीवेळा संपूर्ण पाने खाऊन टाकतात. त्यामुळेही खूप मोठे नुकसान होऊ शकते.
या किडी सोडूनही काही वेळेला काही भागामध्ये इतर किडींचा देखील प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे कीड नियंत्रण करताना या गोष्टी लक्षात घेऊन नियंत्रण उपायांचा अवलंब करावा. त्यामुळे वेळीच कीड नियंत्रण होऊन होणारे नुकसान टाळता येऊ शकते.
स्रोत-इंटरनेट
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
मुनीर पटेल, इचलकरंजी कोल्हापूर
भागीनाथ आसने, अ. नगर
ओंकार शिवाजी जगदंबे, नांदेड
शिवाजी चौगले, राधानगरी कोल्हापूर
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipmschool #IPM #gogreen #vegetables #insect #cauliflowers #smartfarming #agriculture
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा