सर्वोत्तम कीटकनाशके वापरूनही कीड नियंत्रण न होण्याची कारणे आणि उपाय । Reason for Not Getting result Using Best Pesticides

 



शेतकरी सध्या किडीच्या नियंत्रणासाठी सर्रास रासायनिक कीटकनाशकांचा वापर करताना दिसून येतात. खरे तर असे म्हणावे लागेल कि शेतकरी फक्त रासायनिक कीटकनाशकांचाच वापर कीड नियंत्रणासाठी करत आहेत. पिकामध्ये येणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी बरेच वेगवेगळे पद्धतीचा वापर केला तर कीड नियंत्रण तर चांगल्या पद्धतीने होईल आणि खर्चही कमी होईल. 

  पण बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये मिळणारे सर्वात चांगले कीटकनाशक वापरूनही कीड नियंत्रण होताना दिसत नाही तर आज आपण असे होण्यापाठीमागे कोणती कारणे असू शकतात याबद्दल माहिती घेऊया. 


चांगली कीटकनाशके वापरूनही कीड नियंत्रण न होण्यामागे अनेक कारणे आणि उपाय 

१. चुकीच्या कीटकनाशकाची निवड

प्रत्येक कीटकनाशक विशिष्ट प्रकारच्या किडीसाठी बनवलेले असते. जर तुम्ही अळीवर्गीय किडींसाठी तयार केलेले कीटकनाशक रसशोषक किडींवर जसे तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी वापरले तर ते प्रभावपणे काम करणार नाही.

उपाय:- किडीचा प्रकार ओळखून (उदा. रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळ्या) त्यानुसार योग्य कीटकनाशकाचा वापर करावा.


२. चुकीचे प्रमाण

 कीटकनाशकाचा वापर करताना शिफारशीत मात्रा कमी किंवा जास्त झाल्यास अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.

कमी प्रमाण केल्यास कीड पूर्णपणे मरत नाही आणि त्यांच्यामध्ये त्या कीटकनाशकाविरुद्ध प्रतिकारशक्ती (resistance) निर्माण होऊ शकतो.

जास्त प्रमाण केल्यास यामुळे पिकाला रासायनिक इजा पोहोचून नुकसान होऊ शकते आणि अनावश्यक खर्चही वाढतो.

उपाय:- लेबलवर दिलेल्या सूचनेनुसारच योग्य प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करावा.


३. फवारणीची चुकीची वेळ

काही किडी दिवसा सक्रिय असतात, तर काही संध्याकाळच्या वेळेस. चुकीच्या वेळी फवारणी केल्यास कीटकनाशक किडीपर्यंत पोहोचत नाही. तसेच जोराचा वारा वाहत असताना किंवा पाऊस पडण्याची शक्यता असताना फवारणी केल्यास औषध वाया जाते.

उपाय:- शांत हवा असताना आणि सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा फवारणी करा.


४. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती

एकाच प्रकारचे कीटकनाशक वारंवार वापरल्यास किडींमध्ये त्या औषधाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते. यामुळे ती कीटकनाशके त्यांच्यावर परिणामकारक ठरत नाहीत.

उपाय:- वेगवेगळ्या रासायनिक गटांमधील कीटकनाशके आलटून-पालटून वापर करावीत.  


५. फवारणीसाठी वापरले जाणारे उपकरण

चुकीचा स्प्रे पंप: जुने किंवा खराब झालेले नोजल (nozzle) वापरल्यास फवारणी एकसारखी होत नाही.

चुकीची दिशा: पानांच्या खालच्या बाजूला लपलेल्या किडींवर औषध पोहोचत नाही.

अपुरी फवारणी: संपूर्ण पिकावर एकसारखी फवारणी न केल्यास काही ठिकाणी किडी शिल्लक राहतात.

उपाय:- चांगल्या फवारणी पंपाचा वापर करा. पानांच्या दोन्ही बाजूंवर औषध पोहोचावे यासाठी योग्य नोजल आणि फवारणीची योग्य पद्धत वापरा.


६. भेसळयुक्त कीटकनाशके

बाजारात काही वेळा बनावट किंवा भेसळयुक्त कीटकनाशके उपलब्ध असतात. त्यांचा वापर केल्यास हवे तसे परिणाम मिळत नाहीत. 

उपाय:- नेहमी विश्वसनीय दुकानातून आणि प्रमाणित कंपनीचीच कीटकनाशके खरेदी करावीत. खरेदीची पक्की पावती अवश्य घ्यावी.


७. पाण्याची गुणवत्ता

काहीवेळा पाण्याचा सामू (pH) जास्त असतो. त्यामुळे कीटकनाशकाची परिणामकारकता कमी होऊ शकते.

उपाय:- फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा PH तपासून पाण्याचा वापर करावा. PH कमी किंवा जास्त असल्यास तो योग्य करून घेऊनच फवारणीसाठी पाण्याचा वापर करावा. 

    या सर्व कारणांमुळे चांगले कीटकनाशक वापरूनही कीड नियंत्रण होत नाही. प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे.

उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-

भागीनाथ आसने, अ. नगर 

शिव कापसे, परभणी 

सचिन भालेराव, राहता अहिल्यानगर 

पुंडलिक कैलास तांदळे, चाकूर लातूर 

मिलिंद जि गोदे, अचलपूर अमरावती 

शिवाजी चौगले, राधानगरी कोल्हापूर

अविनाश माधव गिरी, माळसेलू जि. हिंगोली

ओंकार शिवाजी जगदंबे, नांदेड 

दिव्याकुमार भोसागे, जयसिंगपूर कोल्हापूर

 समीर 

 उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद

*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in

 *Join Us On Social Media Also👇* 

*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS

 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1

*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR

*Linkedin:-

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/


#ipmschool #IPM #gogreen #pest #pestmanagement #insecticides #agriculture #farming 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊसामधील लोकरी मावा कीड । प्रभावी नियंत्रण । wooly Aphids Management

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

रसशोषक किडी । पिकाचे कसे नुकसान करतात । Damage by Sucking Pest