पपईमध्ये येणाऱ्या किडी । Pest of Papaya |

 🏫IPM SCHOOL🌱




महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये पपई लागवड जास्त प्रमाणात केली जाते तर इतर भागांमध्येही काही शेतकरी पपईची लागवड करतात. पपईमध्ये फार थोड्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. कारण पपईच्या सर्व भागात जे दूध आढळते त्यामुळे किड्यांपासून पिकाचे संरक्षण होते. फळाच्या आतील मऊ खाद्यापर्यंत पोहोचू शकेल इतक्या खोलवर अंडी घालणे अवघड जाते, म्हणून ही फळे बहुधा किडीच्या उपद्रवापासून मुक्त असतात. गुणवत्ता आणि अधिक उत्पादनासाठी पपईवरील किडींचे नियंत्रण करणे महत्त्वाचे असते.


पपईमध्ये प्रादुर्भाव करणाऱ्या किडी

पांढरी माशी:-

या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीपासून दिसून येतो. ही कीड पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पाने खालच्या बाजूने आकुंचन पावतात. पाने पिवळी पडतात त्यामुळे ती आकसल्यासारखी दिसतात व खाली जमिनीच्या बाजूस दुमडलेली आढळतात.


तुडतुडे:-

या किडीचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पाने, फुले व कोवळ्या शेंड्यातील रस शोषणार्‍या व खरवडणार्‍या किडीमुळे कोवळ्या पानावर हिरवे, पिवळे चट्टे पडतात. पाने ओढल्यासारखी दिसतात किंवा गोळा होतात. कोवळी फुले रस शोषल्यामुळे गळून पडतात. ही कीड कापूस, वांगी, भोपळा, काकडी इत्यादी पिकांवर आढळते. या किडीमुळे विषाणू रोगाचा पपईच्या झाडावर प्रसार होतो.


लालकोळी:-

लाल कोळी पपईमध्ये झाडांच्या पानांवर जाळीदार धागे विणतात त्याचबरोबर ही कीड पानाच्या खालच्या बाजूने रस शोषते. त्यामुळे पाने पिवळी पडतात. फळे पिकताना पिवळी धमक न होता फिकट हिरीव-पिवळी राहतात.


मावा:-

मावा हि कीड पानांच्या पाठीमागे समूहाने राहते. हि कीड कमी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांबरोबर कीड दिसायला लागताच नियंत्रण उपाय करणे  या कीटकामुळे विषाणू रोगाचा प्रसार होतो. कलिंगड, चवळी, बटाटा या पिकांवरील मावा कीटक विषाणू रोगाचा प्रसार पपईवर करतात.


मिलीबग:-

इतर किडींपेक्षा या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. प्रौढ मादी पिवळसर रंगाची असून ती पांढर्‍या मेणाच्या लेपने झाकलेली असते. प्रौढ नर गुलाबी असतात. या किडीचा प्रादुर्भाव संपूर्ण झाडावर विशेषतः फळांवर मोठ्या प्रमाणात दिसतो. हे पानांमधून फळांमधून रस शोषण करतात आणि मधासारखा चिकट स्त्राव सोडतात त्यामुळे कॅप्नोडियम बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि किडीने संक्रमित झालेला भाग काजळीयुक्त बुरशीचा प्रादुर्भावामुळे काळा पडतो. 


फळमाशी:- 

 मादी माशी फळांच्या पृष्ठभागाच्या खाली टोकदार ओव्हिपोझिटरच्या सहाय्याने छिद्र करून गुच्छांमध्ये अंडी घालतात.अंड्यातून बाहेर पडलेली पांढरी अळी पाय नसलेली आणि लांबलचक शंकूसारखी असते. अंड्यातून बाहेर पडल्यावर, मॅगॉट्स फळांचा लगदा खातात. अळ्या फळांमध्ये राहून आतून फळे खराब करतात. पुढील दुय्यम संसर्गामुळे प्रादुर्भाव झालेली फळे सडू लागतात. तयार झालेल्या फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव होत असल्याने या किडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.  


सूत्रकृमी (निमॅटोड):-

 पपई झाडाच्या मुळावर गाठी करणार्‍या सूत्रकृमी आणि रेनिफॉर्म सुरूवातीला ठिपक्यांचा आकार  छोटा असतो नंतर तो मोठा होत जातो. फळाची वाढ होत नाही व ती वाकडी होतात. तेलकट ठिपके पानाच्या देठावर व खोडाच्या कोवळ्या भागावर दिसतात. या विषाणू रोगाची बाधा काकडी वर्गातील पिकांना होते. त्यापासून रोगाचा प्रसार पपईच्या झाडावर होतो. झाडाच्या मुळांवर सूत्रकृमी गाठी करतात. त्यामुळे झाडांची वाढ कमी होते व उत्पादन कमी होते.

    

    या किडींचा पपईमध्ये प्रामुख्याने प्रादुर्भाव होताना दिसतो. काही वेळेस पाने गुंडाळणारी अळीचा देखील प्रादुर्भाव काही भागामध्ये पाहायला मिळतो. या किडींचा प्रादुर्भाव पपईमध्ये होत असल्याने सुरुवातीपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. तर कीड नियंत्रण चांगल्या पद्धतीने होऊन पिकाचे नुकसान वाचेल. 

संदर्भ-शेतीमित्र ब्लॉग. 


एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean