सोयाबीनामध्ये रोगांचा प्रादुर्भाव | Disease incidence in soybean







सोयाबीन पिकामध्ये प्रामुख्याने तांबेरा व पिवळा मोझ्याक व्हायरस या दोन रोगांचा प्रादुर्भाव होताना पाहायला मिळतो. 


 पिवळा मोझ्याक व्हायरस(YMV):-  हा रोग हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा मध्ये प्रचलित होता आणि M.P. चे काही भाग तथापि अलिकडच्या वर्षांत ते प्रचलित सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर संक्रमित आहे

मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानच्या मध्यवर्ती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.


 लक्षणे:- 

•पानांवर पिवळे डाग एकतर विखुरलेले असतात किंवा प्रमुख बाजूने अनिश्चित पट्ट्यांमध्ये तयार होतात

सोयाबीनच्या पानांच्या शिरा. 

•पाने परिपक्व झाल्यावर पिवळ्या भागात तांबेरा पडल्यासारखे नेक्रोटिक स्पॉट्स दिसतात.

•काही वेळेस तीव्र विद्रूप आणि पाने वेडेवाकडे होणे देखील दिसून येते. 

•गंभीरपणे संक्रमित झालेल्यांची पाने झाडे पिवळी होतात. •प्रभावित झाडास कमी फुले आणि शेंगा येतात. या रोगाच्या संक्रमणामुळे बियानां मधील तेलाचे प्रमाण कमी होते आणि प्रथिनांचे प्रमाण वाढते.


 प्रसार:- या रोगाच्या प्रसारामध्ये पांढरी माशी(Bamesia tabaci) वाहक म्हणून काम करते. जेव्हा एखादे झाड रोगग्रस्त होते,त्या झाडातील रस पांढऱ्या माशीने शोषला आणि त्याच माशीद्वारे पुन्हा निरोगी झाडातील रस शोषला गेला तर रोग माशीने शोषल्या गेलेल्या रसातून हा विषानू निरोगी झाडांमध्ये प्रवेश करतो. आणि हे सर्व काही सेकंदात होते त्यामुळे रोगाचा प्रसार झपाट्याने होत असतो.


तांबेरा:-

 •सुरवातीस जमिनीलगतच्या पानांच्या खालील बाजूस लक्षणे दिसायला चालू होतात. नंतर वरील पानावर चॉकलेटी-राखाडी/लाल-तपकिरी रंगाचे अनेक ठिपके दिसायला लागतात.

 •या तांबेरा रोगाची लक्षणे इतर रोग जसे जिवाणूजन्य ठिपके(Bacterial blight), केवडा(डाऊनी मिल्ड्यू),सरकोस्पोरा ब्लाईट या रोगांशी थोडी मिळती जुळती असतात त्यामुळे ओळखण्यास अडचण येऊ शकते.

 •या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे कोनाच्या आकाराचे ठिपके, त्यानंतर हे ठिपके मोठे होत जातात.

 •ठिपक्या बाहेरील भाग पिवळा पडतो.लांबून पाहिल्यास रोगग्रस्त भाग पिवळा पडत असल्यासारखा दिसतो.

 •या ठिपक्यांमध्ये तांबूस रंगाची पावडर तयार होते. स्पर्श केल्यास हाताला चिकटते. ही पावडर म्हणजेच या बुरशीचे बीजाणू होय.

 •प्रादुर्भाव प्रमाणाबाहेर असल्यास शेंगा व खोडावर सुद्धा प्रादुर्भाव दिसून येतोच.

 •त्यानंतर खराब शेंगा भरणे,लहान बिया,शेंगा कमी लागणे,अकाली परिपक्वता अशी इतर लक्षणे पिकावर दिसायला लागतात.


 प्रसार:- 

या रोगाचा प्रसार वाऱ्याद्वारे होतो. बुरशीचे बीजाणू हवेच्या प्रवाहासोबत इतर भागात पसरतात.

•सुरवातीस पानावर पडलेला बीजाणू पानावर वाढायला सुरवात करतो.बीजाणू पानांवर पडल्यापासून 9 दिवसात बुरशी परिपक्व होते. मग पुढील चार दिवसात प्रादुर्भाव लक्षणे दिसतात.

•बुरशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर सूक्ष्म बीजाणू तयार होतात. पुढील 3 आठवड्यापर्यंत बुरशी बीजाणू तयार करत असते.हे बीजाणू ऑब्लिगेट परजीवी असतात ते फक्त पण जीवित पानांच्या पृष्ठभागावर वाढू शकतात.

•म्हणूण हे बीजाणू इतर कोणत्या भागावर पडले तर आपला प्रभाव दाखवत नाहीत.म्हणूनच महिनोन्महिने किंवा काही वर्षे ते सुप्तावस्थेत पडून राहतात. 

•जेव्हा अनुकूल वातावरण व योग्य यजमान पीक मिळेल तेव्हा आपला प्रभाव दाखवतात.

•त्यामुळे फार कमी कालावधी मध्ये संपुर्ण शेत या रोगावर व्यापले जाते.


 *उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-*

🌱सुनील कुलकर्णी, बिदर कर्नाटक 

🌱रामकिशन मदनराव गिरी, रेणाखळी, परभणी.

🌱ज्ञानेश कंठाळी, अहमदनगर

🌱प्रकाश कडागावे, निपाणी.

*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*

*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in


 *Join Us On Social Media Also👇* 


*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS


 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1


*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR


*Linkedin:-* 

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस पिकाचे विविध वाण व त्यांची वैशिष्टे | Different Varieties of Sugarcane Crop and their Characteristics

ऊस लागवड करताना उसाची बीजप्रक्रिया कशी करावी | How to process sugarcane seeds while planting sugarcane

वांग्याची झाडे झुडुपासारखी होण्याची कारणे | Reasons for brinjal plants becoming bushy