कोबी पिकामध्ये कीड | Plutella xylostella







*चौकोनी ठिपक्याचा पतंग (डायमंड बॅक मॉथ)*


शास्त्रीय. नाव:- *Plutella xylostella*


*प्रादुर्भाव लक्षणे:-*

मादी पतंग कोबीवर्गीय भाजीच्या पानांवर पिवळसर ५० ते ६० राखी रंगाची अंडी घालतो. त्यातून फिकट हिरव्या किंवा भुरकट रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. अळी अवस्था १४ ते १५ दिवसांची असते. भुरकट रंगाच्या पाकोळीच्या पाठीवर चौकटीच्या आकाराचा पांढरा ठिपका असल्याने 'चौकोनी ठिपक्याचा पतंग' हे नाव पडले आहे.
अळ्या पानाच्या खालचा पृष्ठभाग खरडून खातात. पानांवर असंख्य छिद्रे पडून पान चाळणीसारखे दिसते. जास्त प्रादुर्भाव असल्यास पानाची चाळणी होऊन पानाच्या शिराच शिल्लक राहतात.


*एकात्मिक कीड व्यवस्थापन:-*

  • प्रादुर्भाव ग्रस्त पाने तोडून टाकावीत.
  • एकरी 8 ते 10 कामगंध सापळे (DBM LURE + Delta/Water Trap) चौकोनी ठिपक्याच्या पतंगाच्या नियंत्रणासाठी लावावेत.
  • कोटेशिया प्लुटेला या मित्रकीटकाच्या परजीवी अळीचे संवर्धन करावे.
  • मोहरी या सापळा पिकाच्या २ ओळी कोबीच्या २० ते २२ ओळीनंतर लावाव्यात. मोहरी झाडांकडे ८० ते ९० टक्के चौकोनी ठिपक्याचा पतंग आकर्षित होतात, तर टोमॅटो आंतरपीक घेतल्यास हे पतंग यावर जास्त अंडी घालतात.
  • आर्थिक नुकसान संकेत पातळी:- चौकोनी ठिपक्याचा पतंगाच्या अळ्या:-२ ते ३ प्रति झाड आहे.
  • प्रादुर्भाव दिसत असल्यास निंबोळी तेल (०.०३ टक्के) किंवा कडूनिंब आधारित कीटकनाशक (ॲझाडिरेक्टीन ३००० पीपीएम) ०.५ मिली प्रतिलिटर पाण्यासोबत फवारणी करावी.
  • कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर जात असेल तरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.
  • मुख्य पिकावर पहिली फवारणी (२ अळ्या प्रति रोप दिसू लागताच) बॅसिलस थुरींनजिऐंसीस जीवाणूवर आधारित कीटकनाशकाची (बी.टी.) १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून संध्याकाळच्या वेळी करावी. डायपेल- 8, हाल्ट, डेल्फिन या नावाने औषध बाजारात उपलब्ध आहेत.
संदर्भ-ऍग्रोवन

*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-* 

🌱बाळकृष्ण अंबिलढोके, कोल्हापूर.

🌱अजित चतुरे फलटण सातारा

🌱सागर सोनवणे नाशिक

*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*

.*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in


 *Join Us On Social Media Also👇* 


*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS


 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1


*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR


*Linkedin:-* 

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/

#ipm_school #IPM #gogreen #nitrogen #fertilizer #symptoms #smartfarmer #farmingtips #farming

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस पिकाचे विविध वाण व त्यांची वैशिष्टे | Different Varieties of Sugarcane Crop and their Characteristics

ऊस लागवड करताना उसाची बीजप्रक्रिया कशी करावी | How to process sugarcane seeds while planting sugarcane

वांग्याची झाडे झुडुपासारखी होण्याची कारणे | Reasons for brinjal plants becoming bushy