सोयाबीन पिकामध्ये फेरोमन ट्रॅपचा वापर | Pheromones trap use in soybean crop | IPM



     सोयाबीन पिकामध्ये पाणे खानारी अळी, केसाळ अळी, उंटअळी, शेंगा पोखरणाऱ्या अळी, खोडमाशी,चक्रीभुंगा आणि पांढरी माशी,मावा,तुडतुडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. यापैकी पाने खाणाऱ्या अळीसाठी आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी कामगंध गोळी(lure) व सापळा(Trap) लावला जातो. 

       पाने खाणाऱ्या अळीसाठी (Spodoptera litura) स्पोडो ल्युर व फनेल ट्रॅप वापरावा. शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी (Helicovorpa armigera) हेलिक-ओ ल्युर व फनेल ट्रॅप वापरला जावा. 

       पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव सुरवातीच्या टप्प्यावर झालेला पाहायला मिळतो.

त्यामुळे प्रतिबंध म्हणून सापळे पेरणी झाल्यानंतर पुढील १०-१५ दिवसात एकरी १० या प्रमाणात लावून घ्यावेत. तर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव फुलोरा अवस्थेनंतर पाहायला मिळतो. त्यामुळे पीक फुलोरा अवस्थेत आल्यानंतर हेलिक-ओ ल्युर व फनेल ट्रॅप लावून घ्यावेत, संभाव्य प्रादुर्भाव ओळखुन ८ ते १० सापळे लावून घ्यावेत. सापळा लावलेल्या तारखेपासून ४५ दिवसांनी ल्युर बदलून घ्याव्या. सापळ्यामध्ये सापडणारे पतंग मोजून प्रादुर्भाव किती प्रमाणात आहे याचा अंदाज आपण लावू शकतो. प्रादुर्भाव वाढतोय असं जाणवलं तर सापळ्यांची संख्या वाढवावी. व एकात्मिक कीड व्यवस्थापनामधील इतर पद्धतींचा वापर चालू ठेवावा.  



 *उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-*

🌱सुनील कुलकर्णी, बिदर कर्नाटक 

🌱भागीनाथ असणे, अहमदनगर

🌱विजय गोफणे, बारामती

*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*

*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in


 *Join Us On Social Media Also👇* 


*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS


 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1


*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR


*Linkedin:-* 

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean