घाटेअळीचे जैविक पद्धतीने नियंत्रण | Biological control of caterpillars\ Helicovorpa armigera

 




घाटेअळीचे जैविक पद्धतीने नियंत्रण

हरभरा हे जगभरात घेतले महत्वाचे द्विदल पीक.घाटेअळी(Helicovorpa armigera) ही हरभऱ्यामधील मुख्य कीड. ज्याचे नियंत्रण वेळीच नाही केले गेले तर नुकसान अटळ असते. घाटेअळी ही हरभऱ्या व्यतिरीक्त तूर,सोयाबीन, टोमॅटो, मिरची,कापूस, मक्का,भेंडी अश्या अनेक पिकावर उपजीविका करू शकते. या किडीकडे उपजीविकेसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत म्हणून ही कीड वर्षभर सक्रिय असते. तसेच आजूबाजूच्या वातावरणामध्ये टिकून राहण्याची क्षमता, किटकनाशकांप्रति प्रतिरोध विकसित करण्याची क्षमता असल्याने कीटकनाशकांचा अतिरिक्त वापरावर मर्यादा येतात. कीड नियंत्रण होत नाहीच पण पिकामध्ये कीटकनाशकांचा अंश उतरतो. म्हणून या किडीच्या जैविक नियंत्रणावर आपण भर दिला पाहिजे. फक्त कीटकनाशकांवर अवलंबून न राहता एकात्मिक दृष्टीकोण ठेवून उपाययोजना कराव्या. घाटेअळीचे जैविक नियंत्रण:-
  • कामगंध सापळे,पक्षिथांबे या यांत्रिक पद्धतीसोबत सुरवातीस निम तेल किंवा निंबोळी अर्काची फवारणी करणे महत्वाचे व फायद्येचे ठरते. अँडीपुंज तसेच लहान अळ्यांचे प्रभावी व्यवस्थापन होते.
  • Baccilus thuringiensis(B.T) हा जिवाणू घाटेअळीसाठी पोट विष म्हणून काम करतो. BT युक्त कीटकनाशके फवारल्यामुळे अळीच्या विविध वाढ अवस्थांवर चांगले नियंत्रण होते. व यामुळे किडीमध्ये प्रतिरोधसुद्धा तयार होत नाही.
  • 'जिवो जीवस्य जीवनमः' या उक्ती प्रमाणे काही विषाणू व बुरशी या घाटेअळीसाठी रोगकारक आहेत. त्यामधीलच NPV विषाणू व मेटारझिअम एनीसोपली मित्रबुरशी होय.
  • NPV विषाणू हे विशिष्ट किडीसाठी बनवलेले असतात. घाटेअळीसाठी "NPV(HA)" हे विषाणूयुक्त कीटकनाशक वापरले जाते. या कीटकनाशक फवारल्यानंतर अळीच्या स्पिरॅकलमधून विषाणू अळीच्या शरीरात प्रवेश करतात. अळीच्या शरीरात विषानूची वाढ झाल्याने काही दिवसात अळी मरते. पुन्हा तयार झालेले विषाणू आजूबाजूच्या अळ्यांना रोगग्रस्त करतात.
  • ज्यापद्धतीने आपल्याला त्वचारोग होतात. त्याच पध्दतीने मेटारझिअम एनीसोपली ही मित्रबुरशी अळीच्या शरीरावर वाढते. रोगग्रस्त अळीच्या शरीरावर बुरशीची वाढ स्पष्ट दिसून येते.
  • ट्रायकोग्रामा हा सूक्ष्म मित्रकीटक घाटेअळीच्या पतंगाने दिलेल्या अंड्यामध्ये आपली अंडी देतो. त्यामुळे घाटेअळीची अंडी निष्क्रीय होतात. हे मित्रकीटक ट्रायको कार्ड च्या स्वरूपात आपल्याला उपलब्ध होतात. एका कार्ड वर 20 हजार पेक्षाही अधिक मित्रकीटक असतात. एकरी किमान 5-6 कार्ड लावू शकतो.
  • या सर्व जैविक पद्धतींपैकी उपलब्ध एक पद्धती वापरून घाटेअळीचे पर्यावरण पूरक व्यवस्थापन करू शकतो.



 *उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-*

🌱सुधाकर मेतिल, कोल्हापूर

🌱भागीनाथ असणे, अहमदनगर

*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*

*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in


 *Join Us On Social Media Also👇* 


*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS


 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1


*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR


*Linkedin:-* 

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean